Lok Sabah Servay News
Lok Sabah Servay News Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Servay News : अजितदादांचे सर्व उमेदवार पडणार; ताज्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज...

Chetan Zadpe

Maharashtra News : देशात आता लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी 17 एप्रिल रोजी प्रचार संपणार आहे. मात्र यापूर्वी 'सी व्होटर ' या संस्थेने निवडणुकांबाबत ओपिनियन पोल समोर आला आहे. या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळणार नसल्याचे अंदाज या सर्व्हेने व्यक्त केला आहे. (Loksabha Election 2024)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत 40 आमदार अजित पवारांसोबत गेले. निवडणूक आयोगानेही पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना बहाल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. मात्र या निडणुकीत अजित पवारांना जोरदार धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मात्र पक्षाच्या फुटीनंतरही चांगल यश मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रावादीच्या दोन्ही गटाकडे अजित पवार आण शरद पवार यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनलेली आहे. येत्या 4 जून रोजी याचे सर्व स्पष्टीकरण होईल. मात्र त्या आधी सी व्होटर या संस्थेने केलेल्या सर्वेमधून मात्र अजित पवारांना धक्का बसताना दिसत आहे. अजित पवार यांच्या खात्यात भोपळा येण्याचीच शक्यता आहे.

अजित पवार यांच्या वाट्याला महायुतीत आतापर्यंत चार जागा आल्या आहेत. तर नाशिकच्या जागेवर शिंदे गट - भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरु आहे. नाशिकच्या जागेचा पेच अद्याप सुटलेला नाही. मात्र या जागेवरही अजित पवार गट पिछाडीवर जाईल, असे चित्र आहे. अजित पवार यांची बारामतीत पॉवर वाढवण्यासाठी रासपचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचाही फायदा अजित पवारांना होताना दिसत नाही. कारण सर्व्हेच्या अंदाजानुसार बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

बारामती सुनेत्रा पवारांना अपेक्षित आघाडी नाही -

बारामतीच्या लढतीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. कारण सी व्होटरच्या सर्व्हेनुसार येथून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची पिछेहाट होऊ शकते. या सर्व्हेमुळे अजित पवारांच्या गोटात धाकधूक वाढली आहे. दोन्ही राष्ट्रावादीच्या गटाने या ठिकाणी आपली ताकद पणाला लावली आहे.

शिरुरमध्ये आढळरावांना धक्का बसणार -

अजित पवारांचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी शिरुरमधून पुन्हा शड्डू ठोकला आहे. या सर्व्हेनुसार शिरुरमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हेच पुन्हा शिरुरचे खासदार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रायगडमध्ये सुनील तटकरेंवर परभावाचं सावट -

अजित पवार (Ajit Pawar) गटाचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांचा येथून पराभव होऊ शकतो. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांचा पराभव होऊ शकतो. त्यांच्या विरोधातील ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांचा या ठिकाणी विजय होऊ शकतो.

उस्मानाबादमध्ये ओमराजे बाजी मारणार -

अजित पवार यांना धाराशिव मतदारसंघातही जोरदार धक्का बसण्याचा अंदाज आहे. धाराशिवची जगा अजित पवार यांच्याकडे आहे. येथून राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील मैदानात आहेत. अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. मात्र या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचा विजय होण्याचा अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT