NCP Sharadchandra Pawar News : शरद पवारांचा मराठवाड्यात झंझावात; बीडमध्ये तीन तर संभाजीनगरात एक सभा घेणार..

Sharad Pawar Marathwada Tour : 25 एप्रिल ते 11 मे दरम्यान शरद पवार यांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन एकट्या बीड जिल्ह्यात तर एक सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे.
Sharad Pawar In Beed
Sharad Pawar In Beed Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या प्रचार सभांचा मराठवाड्यात सुरू होणार आहे. पुढील आठवड्याच्या 23 तारखेपासून शरद पवार Sharad Pawar हे मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. 25 एप्रिल ते 11 मे दरम्यान शरद पवार यांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन एकट्या बीड जिल्ह्यात तर एक सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे. NCP Sharadchandra Pawar News

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये NCP फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सुनेत्रा पवार Sunetra Pawar आणि महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्यात लढत होत आहे. म्हणजेच एकाच कुटुंबातील सदस्य ऐकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यामुळे बारामतीतील निवडणूकीकडे Baramati Lok Sabha Election केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar In Beed
Sambhajinagar: ... अन् तेव्हाच शिवसेनेने 'खान-बाण'चे राजकारण संपवले; दानवेंचे ओवेसींना प्रत्युत्तर

शरद पवार Sharad Pawar, अजित पवार Ajit Pawar हे नेते बारामतीत अडकून पडल्याची टीका होत असतांना आता शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्यात शरद पवारांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन सभा एकट्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे Bajrang Sonavane यांच्यासाठी तर एक सभा छत्रपती संभाजीनगरचे Chhatrapati Sambhajinagar महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांच्यासाठी होणार आहे.

25 एप्रिल रोजी शरद पवारांची पहिली सभा बीड लोकसभा मतदारसंघात Beed lok Sabha Constituency माजलगाव येथे होणार आहे. त्यानंतर 1 मे ला छत्रपती संभाजीनगरात शरद पवार सभा घेणार आहेत. त्यानंतर 9 मे रोजी बीडमध्ये तर 11 रोजी अंबाजोगाईत सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यात मतदानाचे तीन टप्पे असून पहिला टप्पा 26 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचा Nanded Loksabha Constituency आहे.

दुसरा टप्पा 7 मे ला असून धाराशीव, लातूर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. शेवटचा टप्पा 13 मे ला असून जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन मतदारसंघात या दिवशी मतदान होणार आहे. या दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार यासह काँग्रेस नेत्यांच्या सभाही मराठवाड्यात होणार आहेत.

शरद पवारांच्या मराठवाड्यातील सभा

  • 25 एप्रिल बीड (माजलगाव)

  • 1 मे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

  • 09 मे बीड

  • 11 मे बीड (अंबाजोगाई)

Sharad Pawar In Beed
lok Sabha Election : संभाजीनगरात ओवेसींच्या निशाण्यावर ठाकरे अन् खैरेच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com