Pritam Munde | Unmesh Patil
Pritam Munde | Unmesh Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

खासदार निधी : प्रितम मुंडेंकडून ०० रुपये तर उन्मेश पाटलांकडून 97 टक्के निधी खर्च

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी 2019 पासून ते आतापर्यंत स्थानिक विकास निधी अर्थात खासदार निधीचा बहुतांश पैसा खर्च केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका वृत्तपत्राने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. सर्व खासदारांनी एकूण मिळून केवळ 45.38 टक्केच निधी खर्च केला आहे. खासदांरानी वैयक्तिकरित्या खर्च केलेल्या निधीची माहिती घेतल्यास सर्वात कमी निधी करण्याच्या बाबतीत बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांचा नंबर लागतो. मुंडे यांनी मागच्या 3 वर्षांमध्ये 1 रुपया देखील खर्च केला नाही. तर सर्वात जास्त निधी खर्च करण्याच्या बाबतीत जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे आघाडीवर आहेत. त्यांनी 97 टक्के निधी खर्च केला आहे.

मध्यंतरी कोरोना काळात 2 वर्षांसाठी खासदार निधी थांबवण्यात आला होता. मात्र त्याआधी आणि त्यानंतर मंजूर झालेला निधी खासदारांनी खर्च केलेला नाही. त्यामुळे आधीच मंजूर निधीचे प्रमाण कमी, त्यात खासदारांकडून खर्चाचे प्रमाण त्याहून कमी अशी अवस्था आहे. यामागे लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण रस्ते, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या प्रमुख पाच कारणांसाठी निधी देण्याची शिफारस करण्याचे अधिकार खासदारांना आहेत. यातून एकप्रकारे खासदार विकास कामे करत असताना त्याचा निवडणुकांमध्येही फायदा कसा होईल, याकडे पाहत असतात.

सर्वात कमी निधी खर्चलेले 10 खासदार

  • डॉ. प्रीतम मुंडे (भाजप, बीड) 2.5 कोटी - 00 - 00%

  • डॉ. जयसिद्धेश्वर महाराज (भाजप, सोलापूर) 5 कोटी - 50 लाख - 9.10%

  • संजयकाका पाटील (भाजप, सांगली) 5 कोटी - 39 लाख - 13.67%

  • रावसाहेब दानवे (मंत्री) (भाजप, जालना) 2.5 कोटी - 45 लाख - 16.1%

  • श्रीरंग बारणे (शिवसेना, मावळ) 5 कोटी - 1.20 कोटी - 22.3%

  • भावना गवळी (शिवसेना, यवतमाळ-वाशिम) 5 कोटी - 1.10 कोटी - 22.12%

  • प्रतापराव जाधव (शिवसेना, बुलडाणा) 5 कोटी -1.20 कोटी - 23.16%

  • रणजितसिंह निंबाळकर (भाजप, माढा) 5 कोटी 1.43 कोटी - 26.62%

  • ओमप्रकाश राजे निंबाळकर (शिवसेना, उस्मानाबाद) 2.5 कोटी - 67 लाख - 27.19%

  • श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, सातारा) 5 कोटी - 1.5 कोटी - 28.04%

सर्वाधिक निधी खर्च केलेले 10 खासदार

  • उन्मेष पाटील (भाजप, जळगाव) 5 कोटी - 4.96 कोटी - 97.30%

  • सुधाकर श्रृंगारे (भाजप, लातूर) 5 कोटी - 3.93 कोटी - 76.73%

  • मनोज कोटक (भाजप, मुंबई उत्तर-पूर्व) 7 कोटी - 4.77 कोटी - 66.71%

  • रक्षा खडसे (भाजप, जळगाव) 5 कोटी - 3.27 कोटी - 63.51%

  • राजेंद्र गावित (शिवसेना, पालघर) 7 कोटी - 4.37 कोटी - 61.05%

  • पूनम महाजन (भाजप, मुंबई उत्तर-मध्य) 7 कोटी - 4.14 कोटी - 57.71%

  • गोपाल शेट्टी (भाजप, मुंबई-उत्तर) 7 कोटी - 4.08 कोटी - 56.85%

  • रामदास तडस (भाजप, वर्धा) 7 कोटी - 4.02 कोटी - 56.11%

  • संजय जाधव (शिवसेना, परभणी) 7 कोटी - 3.9 कोटी - 54.45%

  • इम्तियाज जलील (एमआयएम, औरंगाबाद) 7 कोटी - 3.81 कोटी - 53.03%

आमचा संबंध फक्त आमदार निधीशी : उपमुख्यमंत्री अजित पवार

याबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले, खासदारांना कोरोना काळात 2 वर्ष निधी बंद होता. पण त्यानंतर 31 मार्चपर्यंत 2.5 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निधी निर्णय झाला. माझ्या माहिती प्रमाणे त्यांचा निधी लॅप्स होत नाही. कदाचित ते 3 महिने कोणती काम घ्यायची कोणती, काय काम करावी आणि कोरोनाचे देखील सावट होते. त्यामुळे हा निधी त्यांना खर्च करता आला नसावा. पण नवीन वर्षात ते हा निधी खर्च करु शकता. पण अंतिमतः हा आमचा संबंध केवळ आमदार निधीशी येतो आणि आमदार हा निधी त्यांच्या वेळेत व्यवस्थित खर्च करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT