अमरावती :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) या निवास स्थानासमोर जाऊन येत्या २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. त्यासाठी ते आज (ता. २२ एप्रिल) विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार होते. (Ravi Rana-Navneet Rana News)
त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून (shivsena) नियोजन केले जात असताना अचानक राणा पती-पत्नी मुंबईत दाखल झाले आहेत. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा गनिमी काव्याने मुंबईत दाखल झाल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी ते हनुमान चालिसा पठण करणार आहेत.
आज (शुक्रवारी) ते संध्याकाळी अमरावतीमधून रेल्वेने निघणार होते. मात्र शिवसेनेने त्यांना विरोध दर्शविला होता. त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिक सज्ज होते.पोलीस सुध्दा राणा दाम्पत्याला स्थानबद्ध करण्याच्या तयारीत होते. मात्र त्यापूर्वीच शिवसैनिक आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन राणा दाम्पत्य पसार झाले.
शिवसेनेकडून (shivsena) राणा दांपत्यांला मातोश्रीपासून लांब ठेवण्यासाठी बैठका घेऊन नियोजन केले आहे. दुसरीकडे, पोलिस प्रशासनही राणा पती-पत्नीस अमरावतीतच (Amravati) रोखणार होते. राणा दाम्पत्य व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. आज या आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना मुंबईत मातोश्रीवर जाण्यापूर्वीच अमरावतीत पोलिस रोखणार होते. राणा दांपत्यांच्या सर्व हालचालीवर काल रात्रीपासून अमरावती पोलिसांची नजर होती. नवनीत आणि रवी राणा हे आज रात्री ७ वाजता विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत जाणार होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.