Ambadas Danve Sarkarnama
महाराष्ट्र

Satara doctor death case : महिला डाॅक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना सहआरोपी करा; पुरावे दाखवत दानवेंची मोठी मागणी

Ranjitsinh Nimbalkar Ambadas Danve : माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे महिला डाॅक्टरवर दबाव टाकत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. या प्रकरणात निंबाळकरांना सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Roshan More

Ambadas Danve News : फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरने आत्महत्या प्रकरणात माजी खासदाराने दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. डाॅक्टर महिलेच्या नातेवाईकांनी हा आरोप केला आहे. दरम्यान, हा भाजपचा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर असल्याचा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी महिला डाॅक्टरने दिलेल्या लेखी तक्रारीचे फोटो देखील पुरावे म्हणून दानवेंनी दाखवले.

दानवे म्हणाले, 'माजी खासदारांच्या दोन पीए नागटीळक आणि राजेंद्र शिंदे यांनी माजी खासदाराचे बोलणं महिला डाॅक्टरशी करून दिलं. महिला डाॅक्टरने चौकशी समितीसमोर दिलेल्या लेखी जबाबात ते दिले आहे. माझी मागणी आहे पीआय महाडीक, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना या प्रकरणात सहआरोपी करावे.'

'जाणीवपूर्वक रात्री १२ वाजता महिला अधिकाऱ्याला फोन करून दबाव आणणे चूक आहे. म्हणून पोलिस काही जरी म्हणत असेल तर पीआय महाडीक याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. महाडीक हा माजी खासदार आणि आमदाराचा दलाला आहे. त्याचे प्रमोशन देखील थांबले पाहिजे.', असे देखील दानवे म्हणाले.

'महिला डाॅक्टरने पीआय महाडीक याच्याकडे लेखी तक्रार केली होती. ते पत्र माझ्याकडे आहे. 19 जूनला तक्रार केली, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परत आठवणीचे पत्र ऑगस्टमध्ये दिले. मात्र, त्यामध्ये देखील काही झाले नाही. त्यामुळे पीआय महाडीकला आरोपी करा.', असे देखील ते म्हणाले.

'माजी खासदार, त्यांचा भाऊ अभिजित निंबाळकर आणि पीए यांच्या उच्छाद आहे फलटणमध्ये. यांच्याविषयी कोणीच बोलत नाही. माजी खासदारांचा राजकीय दबाव टाकतात. त्यांच्या पक्षाचा नसेल तर त्यावर सामान्य गुन्हा असेल तर त्याचा 307 करा, यांच्या पक्षाच्या माणसावर 307 असेल तर 324 करा म्हणून दबाव टाकतात. ', असा आरोप देखील त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT