Police Recruitment: वयोमर्यादा ओलांडलेले सराव करून थकले! स्थानिक निवडणुकीमुळे पोलिस भरतीला 'ब्रेक'

Police recruitment delayed due to local body election code of conduct: ऑगस्टमध्ये पोलिस भरतीचा शासन निर्णय निघाल्याने तरुण-तरुणींना मोठा आनंद झाला होता. पण आता त्यांचा आनंदावर विरजन पडणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
Maharashtra Police recruitment
Maharashtra Police recruitmentSarkarnama
Published on
Updated on

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होत असतानाच निवडणुकीच्या आचारसंहितेत पोलिस भरती अडकणार असल्याचे चित्र आहे.

२०२२ ते २०२५ पर्यंत वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. वयोमर्यादा संपल्यामुळे पोलिस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी आहे. पण आता ते तरुण-तरुणी भरतीचा सराव करून थकले, पण भरती प्रक्रिया अजून सुरू होऊ शकलेली नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.

राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस शिपायांची पदे भरण्यात येणार आहेत. याबाबतची आदेश देण्यात आला आहे. पण सरकारी निर्णय जाहीर होऊन आता दोन महिने झाले तरी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली नसल्याचे इच्छुक तरुण-तरुणींनी नाराजी व्यक्त केली आहे.

आता ऑक्टोबर महिना संपत आला आहे. तरीही भरती प्रक्रिया सुरु होण्यासाठी पोलिस प्रशासना पातळीवर कुठलीही हालचाल दिसत नाही. नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन ते तीन टप्प्यात जानेवारी अखेरपर्यंत या निवडणुका असतील.

या आहारसंहितेच्या कालावधीत पोलिस भरती प्रक्रिया होणे अशक्य आहे. गृह विभागाच्या अंतिम मान्यतेनंतर भरतीची प्रक्रिया पुढे सुरू होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

पोलिस भरती आचारसंहिता संपल्यावर ऐन उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात (पहिल्यांदा मैदानी चाचणी घेतली जाते) सुरू होईल की काय, असा प्रश्न पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण- तरुणींमध्ये होत आहे. ऑगस्टमध्ये पोलिस भरतीचा शासन निर्णय निघाल्याने तरुण-तरुणींना मोठा आनंद झाला होता. पण आता त्यांचा आनंदावर विरजन पडणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Maharashtra Police recruitment
Satara News: फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एकाला अटक

राज्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. त्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिस यंत्रणेवर ताण येत आहे. पोलिस दलातील रिक्त होणारी १०० टक्के पदे वेळोवेळी भरली जातात. गणेशोत्सवानंतर पोलिस भरतीस प्रारंभ होईल, असे प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले होते.

अशी आहेत भरतीची पदे

  • पोलिस शिपाई : १२,३९९

  • चालक : २३४

  • बॅण्डसमन : २५

  • सशस्त्र पोलिस शिपाई : २,३९३

  • कारागृह शिपाई : ५८०

  • एकूण : १५,६३१

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com