Shivsena UBT News : राज्य सरकारच्या कृषी वाहिनी योजनेत दहा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत खळबळ उडवून देणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या संदर्भातले काही पुरावे सादर केले.
बोगस बँक गॅरंटी आणि प्रशासकीय अनागोंदीवर बोट ठेवत त्यांनी कृषी वाहिनी योजनेत 10 हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांवर आपण ठाम असल्याचे सांगीतले. अंबादास दानवे यांनी यापूर्वी या संदर्भात आरोप केले होते. तेव्हा सत्ताधारी पक्षांनी त्यांच्याकडे पुरावे मागीतले होते. त्यानुसार आज (ता.9) पत्रकारांशी संवाद साधताना दानवे यांनी ज्या पुराव्यांच्या आधारे घोटाळा झाल्याचा आरोप केला ते पुरावेच समोर मांडले.
या योजनेत सहभागी झालेल्या कंपन्यांनी बोगस बँक गॅरंटी सादर केली होती ज्याची माहिती असूनही अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असतानाही काम सुरू झाले नाही. उलट बोगस कागदपत्रांच्या आधारे जमिनी स्वत:च्या नावावर करून अर्थ सहाय्य उचलण्यात आल्याचा दावा दानवे यांनी केला.
या प्रकरणात राहुल पन्हाळे या अधिकार्यांसह इतर काही जणांविरूद्ध तक्रारी होत्या. या प्रकरणात आतापर्यंत चार अधिकारी निलंबित झाले आहेत. घोटाळा झाला नाही, असा दावा जर सरकार करत असेल तर मग या अधिकार्यांना निलंबित का केले? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला. नांदेडमध्ये 3 हजार एकर जमीन मेघा इंजीनियरिंग कंपनीला दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
यापुर्वी आपण पाच तक्रारींबद्दलच बोललो होतो, आता आपल्याकडे सहावी तक्रार आली आहे. या सगळ्या प्रकरणात पोलीसांनी गुन्हेही नोंद केले आहेत, असे दानवे यांनी स्पष्ट केले. गुवाहाटी, गुजरात राज्यातील काही कंपन्यांचा या घोटाळ्यात समावेश आहे. या तक्रारी संबंधित विभागाने करायला हव्या होत्या, पण मुंबईच्या आर्थिक विभागाने तपास करून हा गुन्हा दाखल केलेला आहे, असा दावाही अंबादास दानवे यांनी केला.
फेक मेल, बोगस बँक गँरटी या संबंधित कंपन्यांनी दिले होते. राहुल पन्हाळे नावाचा अधिकारी या सगळ्या प्रकरणात आघाडीवर असल्याचे दिसते. बँकांनी पूर्णपणे आम्ही संबंधित कंपन्यांना बँक गँरटी दिलेली नाही, हे स्पष्ट सांगितले आहे. 2024 मध्ये निविदा निघाल्यानंतरही काम सुरू न झाल्यामुळे दोन वर्षांनी सरकारला जाग आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली. सरकारच्या पाठिंब्याशिवाय हा घोटाळा होणे शक्य नाही, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.