Ashok Chavan : नांदेड महापालिकेत विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसचे अशोक चव्हाणांना साकडे? माजी महापौरांच्या मुलाने घेतली भेट, चर्चांना उधाण

Nanded Wagahal Municipal Corporation Politics : नांदेड वाघाळा महापालिकेत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली आहे. यामुळे महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसह इतर महत्वाच्या समित्याही भाजपच्या खात्यात गेल्या आहेत.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • नांदेड वाघाळा महापालिकेत भाजपने ४५ नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

  • महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांवर भाजपचे वर्चस्व राहणार आहे.

  • विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस-वंचित आघाडी आणि एमआयएममध्ये राजकीय चुरस सुरू आहे.

Nanded News : नांदेड वाघाळा महापालिकेत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 45 नगरसेवक निवडून आणत बहुमतासह सत्ता मिळवली. महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसह स्थायी समिती व विविध समित्यांवर भाजपचाच वरचष्मा राहणार आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्ष नेते पदासाठी काँग्रेस-वंचित आघाडी आणि एमआयएम या दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल गफार यांनी नुकतीच खासदार अशोक चव्हाण यांची मुंबईमध्ये भेट घेतल्याची चर्चा आहे. काँग्रेस- वंचित बहुजन आघाडीची एकत्रित संख्या ही एमआयएम पेक्षा जास्त आहे. तर एमआयएमकडे 14 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून विरोधी पक्ष नेते आपल्या पक्षाला मिळावे यासाठी एमआयएम प्रयत्नशील आहे.

अब्दुल गफार यांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे संख्याबळ लक्षात घेता विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याच कृपेने अब्दुल सत्तार हे नांदेड वाघाळा महापालिकेचे महापौर झाले होते. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले आणि जिल्ह्यातील सर्वच सुत्रे त्यांच्या हाती सोपवली.

Ashok Chavan
Ashok Chavan on NCP : नांदेड महापालिकेत कसेबसे खाते उघडलेल्या राष्ट्रवादीला अशोक चव्हाणांचा खोचक टोला,'घड्याळ आता हळूहळू..!'

नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका या सगळ्या निवडणुका अशोक चव्हाण यांनी आपल्या एकहाती नेतृत्वाखाली लढवत पक्षाला मोठे यश मिळवून दिले. महापालिकेत पहिल्यांदाच कमळ फुलले असून भाजपची एकहाती सत्ता आली आहे. अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर काही मोजक्याच स्थानिक नेत्यांनी त्यांच्यासोबत पक्षांतर केले होते.

काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते मात्र पक्षा सोबतच राहिले. कालांतराने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे जसजशी बदलत गेली तसे काठावर असलेले काँग्रेसचे अशोक चव्हाण समर्थक भाजपवासी झाले. महापालिका निवडणुकीत एमआयएमचे आवाहन लक्षात घेता मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळू नये यासाठी अशोक चव्हाण यांनी खेळी खेळली. काही आपल्या काँग्रेसमधील समर्थक नगरसेवकांना महापालिका निवडणुकीच्या आधी एमआयएममध्ये प्रवेश करायला लावला. या प्रवेशाने मतांच्या विभाजनाचा फटका भाजपला न बसता तो काँग्रेसला बसावा अशी व्यवस्था केली होती.

आता महापालिकेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेस-वंचित आघाडी आणि एमआयएममध्ये रस्सी खेच पाहायला मिळत आहे. तिन्ही पक्षात सुरू असलेल्या स्पर्धेत आपल्याला संधी मिळावी यासाठी अब्दुल गफार यांनी अशोक चव्हाण यांना साकडे घातले आहे. आता काँग्रेसमधील आपले जुने मित्र माजी महापौर अब्दुल सत्तार यांच्या पुत्रासाठी अशोक चव्हाण मदत करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एमआयएम आणि काँग्रेस पक्षाने विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला असला तरी यात कायदेशीर बाबी तपासाव्या लागणार आहेत. नांदेड महापालिकेत भाजप 45, शिवसेना 04, काँग्रेस 10, वंचित 5, एमआयएम 14, राष्ट्रवादी काँग्रेस 2, तर 1 अपक्ष असे चित्र आहे. काँग्रेस-वंचित आघाडीची निवडणूक पूर्व आघाडी असल्यामुळे या पक्षाचे संख्याबळ हे एकत्रित गृहीत धरले जाणार हे स्पष्ट आहे. दुसरीकडे एमआयएमने 14 जागांसह आम्ही दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहोत, असा दावा केला आहे. यामुळे आता विरोधी पक्ष नेता काँग्रेस-वंचित आघाडीचा होणार की एमआयएमचा? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ashok Chavan
Ashok Chavan BJP : अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात नांदेड-वाघाळा महापालिकेत शतप्रतिशत भाजपा; पाठिंबा देऊनही शिवसेनेची झोळी रिकामीच!

FAQs :

1. नांदेड वाघाळा महापालिकेत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले?
भाजपने ४५ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे.

2. या विजयात कोणत्या नेत्याची भूमिका महत्त्वाची मानली जाते?
खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपला हा विजय मिळाल्याचे मानले जाते.

3. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्या पक्षांमध्ये स्पर्धा आहे?
काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात स्पर्धा आहे.

4. अब्दुल गफार यांनी कोणाची भेट घेतली?
अब्दुल गफार यांनी मुंबईमध्ये खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

5. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश कधी केला?
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com