CM Devendra Fadnavis- Ambadas Danve News Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve : ‘चोरीचा माल परत केल्याने गुन्हा रद्द होतो का?’, मुंढवा जमीन प्रकरणात अंबादास दानवेंचे फडणवीसांना सहा प्रश्न

Ambadas Danve Parth Pawar Devendra Fadnavis : अंबादास दानवे यांनी मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा प्रश्न विचारले आहेत.

Roshan More

Ambadas Danve News : मुंढवा येथील जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर या व्यवहार प्रकरणी आरोप करण्यात येत होते. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे देखील आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात व्यवहार रद्द झाल्यानंतर अंबदास दानवे यांनी 'चोराने चोरी केली आणि ती धरली गेली.. धरल्यावर चोरीचा ऐवज वापस केला जात असेल तर ती चोरी होत नाही का मुख्यमंत्री महोदय? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी केला केला.

या प्रश्नासह दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात सहा प्रश्न विचारले आहेत. एखाद्या कंपनीचे भांडवल लाखभर रुपये असताना ती कंपनी जमीन खरेदीसाठी ३०० कोटी कुठून आणि कसे आणते? कंपनीच्या या ३०० कोटींचा सोर्स काय? सही एकाची असली तरी त्याने ती त्या कंपनीच्या वतीने केली आहे. सहीचा हक्क दिलेला असताना कंपनीचा ठराव त्याच्या जोडीला असतो. मग गुन्हा फक्त एकावरच कसा? असे प्रश्न दानवे यांनी विचारले असते.

ईडीकडून चौकशी का नाही?

शासनाचा कर बुडवला ही शासनाची फसवणूक आहे, मग पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही? कंपनीवर ही गुन्हा का दाखल नाही? नैतिकता आणि पारदर्शक सरकार असल्याचे आपण सांगता. मग अजित पवारांच्या राजीनाम्यावर अद्याप निर्णय कसा झालेला नाही? घपल्याचे आकडे पाहता, हे प्रकरण अजून ईडीकडे देण्यास सरकार इच्छुक का नाही? असे प्रश्नही दानवे यांनी विचारले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी समिती नेमावी...

मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही... आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत.. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या, अशी मागणी करत न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी. अशी आमची स्पष्ट मागणी आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT