Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : अजित पवारांचा पक्ष अमित शाह संपवणार? संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut statement on Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. अमित शाह आणि भाजपच्या राजकीय रणनीतीवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Rashmi Mane

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय समीकरणांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट आणि राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

अमित शाह महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षही भविष्यात संपुष्टात येईल, असा दावा राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या मते, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये फूट पाडून राज्याची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते म्हणाले, "अजित पवारांनंतर हा पक्ष अनाथ झाला आहे. शरद पवारांनी उभा केलेला पक्ष आज गुजराती लोकांच्या पायाशी नेऊन ठेवला आहे. अमित शाह यांच्या पायाशी बसून या नेत्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे बांधले आहे, यांना लाज वाटली पाहिजे."

पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाले असले, तरी त्यामुळे पक्षाची ताकद टिकून राहीलच असे नाही, असेही राऊत यांनी म्हटले. त्यांच्या मते, हे दोन्ही गट स्वतंत्र राजकीय अस्तित्व टिकवू शकणार नाहीत. आगामी काळात त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल, असाही दावा त्यांनी केला.

चीनच्या निधीवरून भाजपला सवाल

यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि पीएम केअर्स फंडाच्या निधीबाबतही गंभीर आरोप केले. त्यांच्या दाव्यानुसार, पीएम केअर्स फंडात चिनी कंपन्यांकडून 1714 कोटी रुपये, तर भाजपच्या पार्टी फंडात 911 कोटी रुपये आले आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारला सवाल उपस्थित केला.

SCROLL FOR NEXT