MNS Amit Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते प्रथमच सक्रीय राजकारणात उतरले असून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांची साम मराठीने विशेष मुलाखत घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुदय्यांवर सविस्तरपणे आपले मत मांडले.
दरम्यान महाराष्ट्राचं बदललेलं राजकारण आणि २०१९मध्ये भाजप शिवसेनेची तुटलेली युती, त्यानंतरची शिवसेनेतील बंडखोरी आदींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अमित ठाकरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
अमित ठाकरे(Amit Thackeray) म्हणाले, 'तो विचार सोडून जर तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी पक्ष बदलत असाल, तर मला वाटतं कुठंतरी तो ब्लंडर तिथून सुरू झाला. गेलेल्या ४० आमदारांपैकी अनेकजण हे कोअर शिवसैनिक होते. जे बाळासाहेबांच्या विचारावर चालत होते. त्यांना जे बाळासाहेबांचे विचार आहेत, की काँग्रेसच्या विरोधात जे त्यांनी मांडले त्यांच्या उमेदवारांबरोबर, त्यांच्या आमदारांसोबत बसायला उठायला कसं वाटतं असेल मी विचारही करू शकत नाही. म्हणजे अचानकच हे वळण आलं. त्यामुळे जे ४० आमदार गेले त्यातील अनेक कोअर शिवसैनिक आहेत, मी त्यांना दोष देणार नाही. कारण, २०१९मध्ये हा ब्लंडर सुरू झाला.
तर त्या आधीही मनसेचेही(MNS) अनेक नगरसेवक पक्ष सोडून गेले होते? या प्रश्नावर उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले, 'सोडून नव्हते गेलेले, ते फोडले होते. हे जे आता खोके खोके बोलत आहेत, आमच्या त्या सहा नगरसेवकांना किती खोके दिले होते, मला माहीत आहे. म्हणून मी बोलतोय की लॉयलटी काय असते, कारण ते सातवे नगरसेवक संजय तोडे यांनी मला सांगितलं, मलाही तो फोन आला होता परंतु मी गेलो नाही. माझे वडील तेव्हा कशा परिस्थितीमधून जात असतील हा मी एक विचार केला. की तुम्ही सहा नगरसेवक फोडताय, बरं मागितले असते तर राज साहेबांनी दिलेही असते. त्यामुळे कुठंतरी आपण हा विचार केला पाहीजे. आपण कर्म म्हणतो ना ते कुणालाच चुकत नाही.'
याशिवाय 'मतदारांना 2019चा राग जर काढायचा असेल तर ही 2024ची निवडणूक आहे. कारण, त्याआधी विधानसभेची निवडणूकच झालेली नाही. त्यामुळे मतदारांचा जो राग आहे, तो आता निघेल असं मला वाटतं.' अशा शब्दांमध्ये अमित ठाकरे यांनी मतदारांना एकप्रकारे आवाहनच केल्याचं दिसून आलं.
याआधी 'खरं तर राजकारणात यायची माझी कधीच इच्छा नव्हती. पण २०१४ नंतर पक्षाची जी घसरण सुरू झाली, तेव्हा मला वाटलं की राज साहेबांनी एवढा मोठा पक्ष उभा केला आहे, एवढ्या लोकांच्या जोरावर केला आहे. मला वाटलं कुठतरी आपला एक टक्का तरी हातभार लागला पाहीजे. ही आपली जबाबदारी आहे. लहानातील लहान प्रश्न सुटल्यावर सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटतं ते मला भावलं. म्हणून मला वाटलं की पक्ष तर आहेच, परंतु माझं ध्येय अजून मोठं आहे, की महाराष्ट्रातील सर्वांच्याच चेहऱ्यावर मला ते हास्य आणायचं आहे.राज ठाकरेंचा महाराष्ट्राबाबतचा जो विचार आहे, तो नेमका काय आहे हे मला माहीत आहे.' अशं म्हणत अमित ठाकरेंनी आपल्या सक्रीय राजकारणातील पदार्पणाबाबत सांगितलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.