Amit Thackeray Interview: 'माहिम'मधून मनसेची उमेदवारी जाहीर झालेल्या अमित ठाकरेंनी आपलं पुढचं ध्येयही सांगून टाकलं

MNS Leader Amit Thackeray Big Statement : 'मी शांतपणे जरी माझी भूमिका मांडत असलो तरी कुणालाही न घाबरता असते.कदाचित राजसाहेबांची आणि माझी शैली वेगळी असेल, असेही अमित ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही दोघेही खोटे बोलू शकत नाही', असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
Raj Thackeray, Amit thackeray
Raj Thackeray, Amit thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीही निवडणुकीच्या मैदानात उतरले नाही.पण ते कायमच 'किंगमेकर'च्या भूमिकेत राहिले.महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत: सह शिवसेनेचा दबदबा निर्माण करण्यासोबतच त्यांनी अनेकदा सत्तेचा रिमोटही आपल्याच ताब्यात राहिल याचीही काळजी घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दुसर्‍या पिढीनेही बाळासाहेबांचा निवडणूक न लढवण्याचा शिरस्ता कायम ठेवला.

पण ठाकरे कुटुंबातील तिसरी पिढी अर्थात आदित्य ठाकरेंनी मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत थेट जनतेतून निवडणूक लढवत वरळीतून आमदारकी जिंकली. आदित्यनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेही (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना मनसेकडून माहिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याच अमित ठाकरेंनी आता निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच आपण राजकारणात का आलो, तसेच पुढचं ध्येयही सांगून टाकलं आहे.

कधीकाळी राजकारणात येणार नाही, असं दावा करणारे अमित ठाकरे थेट विधानसभेची 2024 निवडणूक लढवणार आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी 'साम वृत्तवाहिनी' ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत राजकारणात न येण्याचा दावा ते मनसेची (MNS) उमेदवारी या बदलेल्या भूमिकेमागची पूर्ण कहाणीच उलगडून सांगितली.

तसेच आमदारकी मिळो अथवा न मिळो पण पुढील काळात राजकारणात काम करताना त्यांचं ध्येयही सांगून टाकलं.

Raj Thackeray, Amit thackeray
Solapur Politic's : सांगलीप्रमाणे ‘सोलापूर दक्षिण’मध्ये धाडस कराल तर अवघड जाईल; शिवसेनेचा काँग्रेसला धमकीवजा इशारा

अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले... ?

अमित ठाकरे म्हणाले, मला राजकारणात यायची कधीही इच्छा नव्हती.पण 2014 नंतर पक्षासोबत जो काही डाऊन फॉल सुरू झाला,त्यावेळी कुठंतरी मला वाटलं की, साहेबांनी लोकांच्या जोरावर एवढा मोठा पक्ष स्थापन केला,त्यात माझाही कुठंतरी हातभार लागला पाहिजे,म्हणजे 1 टक्के जरी लागला पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे असं मला वाटलं.

त्यानंतर 2015 ला शिवाजी पार्क परिसरात रस्त्यावर असलेल्या झाडांवर एका रोग पडला होता. त्यावेळी ती झाडं वाचविण्यासाठी महापालिका आयुक्तांना भेटलो होतो, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही भेटलो. त्यावेळी आम्ही एका किड्यामार्फत ती झाडं वाचवली.त्यावेळी तिथं नेहमी फिरायला येणारे एक आजोबा मला म्हणाले, बाळ तू हे जे काम करतोयस ते फार छान आहे.ते कुठंतरी माझ्या बॅक ऑफ दि माईंड बसलं आणि वाटलं जे चाललंय ते योग्य आहे. आपलं काही चुकत नाही, लोकांना बरं वाटलं, याचं जे समाधान आहे ना ते फार महत्त्वाचं आहे.

Raj Thackeray, Amit thackeray
Sanjay Raut Politics: संजय राऊत यांना राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर, थेट प्रचारालाच दिला नकार!

लोकांचे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात,पण ते सुटल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर जी स्माईल येते ना ती मला फार आवडली. पक्ष तर आहेच, माझं ध्येय त्यापेक्षाही मोठं आहे,महाराष्ट्रभर लोकांच्या चेहर्‍यावर मला ती स्माईल आणायची आहे, अशी आपली 'मन की बात' ही अमित ठाकरे यांनी यावेळी सांगितली.

राज ठाकरेंशी जेव्हा तुलना केली जाते तेव्हा ते खूप आक्रमक आणि तुम्ही खूप संयमी वाटतात या प्रश्नांवरही अमित ठाकरेंनी उत्तर दिलं. ते म्हणाले, माझ्यापेक्षा राजसाहेबांनी खूप काही जास्त जग पाहिलं आहे. त्यांनी महाराष्ट्राची सगळी परिस्थिती जवळून पाहिली आहे. त्यांचा जो महाराष्ट्राबद्दलचा जो विचार आहे,तो मला माहिती आहे,त्यांना महाराष्ट्र नेमका कुठं नेऊन ठेवायचा आहे. पण असा विचार असतानाच महाराष्ट्र एकीकडे खाली पडत चालला आहे.त्यामुळे तुम्हांला जे वाटतं ना, साहेब हसत का नाही, तर त्याच्यापाठीमागं हे सगळं सुरू आहे.

Raj Thackeray, Amit thackeray
Amit Thackeray : मोठी बातमी! अमित ठाकरेंसाठी महायुतीची माहिममधून माघार घेणार?

त्यांच्या मनात जे काही सुरू आहे ना.त्यांना असं वाटतंय की, मला एवढं सारं माझ्या राज्याला द्यायचं आहे, बाहेर हे सर्व असं चाललंय.पण त्यांच्याशी माझी तुलना होऊच शकत नाही,कारण मी आत्ताच राजकारणात आलोय. पण मला माहितीय राजसाहेबांवर विश्वास ठेवून लोकं सत्ता देतील,त्यावेळी मी काय करू शकतो, असंही अमित ठाकरे म्हणाले.

मी शांतपणे जरी माझी भूमिका मांडत असलो तरी कुणालाही न घाबरता असते.कदाचित राजसाहेबांची आणि माझी शैली वेगळी असेल असेही अमित ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही दोघेही खोटे नाही बोलू शकत असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com