Amol Mitkari presents an old video of Laxman Hake sharply criticizing Devendra Fadnavis, fueling political controversy. sarkarnama
महाराष्ट्र

Laxman Hake : 'फडणवीसांच्या सभ्य चेहऱ्याआड...', लक्ष्मण हाकेंचा 'तो' व्हिडिओ मिटकरींनी दाखवला

Amol Mitkari Laxman Hake Devendra Fadnavis : लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ शेअर करताना अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, 'राष्ट्रवादीकडून पान उतारा झाल्यावर हा गडी आता भाजप नेतृत्वावर तोंड सुख घेतोय.

Roshan More

Hake Vs Mitkari : लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरू आहे. हाके यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करत ते ओबीसींना निधी देत नसल्याचा आरोप केला. या आरोपाला मिटकरी यांनी उत्तर देताना हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असलेला व्हिडिओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके म्हणत आहेत की, '2024 पासून एका सभ्या चेहऱ्याआडचा एक असभ्य माणूस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या राशीला आला आहे. त्या माणसाचे नाव आहे देवेंद्र फडणवीस. हा माणूस कधी मास लीडर नव्हता ना कधी महाराष्ट्रातील 5-25 मतदारसंघावर या माणसाची पकड आहे. ना हा लोकप्रिय आहे. या माणसाने सभ्य असभ्यतेच्या पातळांचा सर्वात खालचा कळस गाठला आहे.'

'2024 पासून महाराष्ट्राच्या राजकारणतील या माणसाने इथिक्स, वॅल्यू संपले आहे. भाजपला शिखरावर जे लोक घेईन गेले त्या भाजपमधील प्रामाणिक माणसांना यांनी संपलं आहे. चळवळीतील माणसांना संपवलं आहे. महादेव जानकर, राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांपर्यंत अनेक माणसांना यांनी संपवलं आहे.', असे हाके व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ जुना असण्याचा शक्यता वर्तवली जात आहे. या व्हिडिओची पुष्टी 'सरकारनामा' करत नाही.

हाकेंचा व्हिडिओ शेअर करताना अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, 'राष्ट्रवादीकडून पान उतारा झाल्यावर हा गडी आता भाजप नेतृत्वावर तोंड सुख घेतोय. एकीकडे हा स्वतः एकटाच ओबीसी नेता असताना दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी भाषा? आता सुसंस्कृतपणा कुठे गेला? म्हणुन याला झाकण झुल्या म्हणतात.'

हाकेंच्या तोंडाला काळं फासणार

लक्ष्मण हाके हे पातळीसोडून अजित पवारांवर टीका करत आहेत. बारमध्ये, गुत्त्यावर बसणारा हाके केव्हापासून ओबीसी समाजाचा नेता झाला, अशी विचारणा करून तो नेता नव्हे तर दलाल आहे, अशी टीका नागपूर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी हाकेंवर केली. तसेच हाकेंच्या तोडाला काळं फासण्याचा इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT