Nitesh Rane Politics: बडगुजर, सय्यद यांच्यावर गंभीर आरोप करून सभागृह हादरवून टाकणारे नितेश राणे आता काय करणार?

Nitesh Rane; BJP will take on the heads of those who were declared criminals by Nitesh Rane -नितेश राणे यांनी विधानसभा हलवून सोडलेल्या आरोपांवर त्यांचाच पक्षाचे घुमजाव केले
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उपनेते सुधाकर बडगुजर यांना बडतर्फ केले. सुधाकर बडगुजर भाजप पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या भूमिकेने अनेक नेते बॅकफुटवर जाणार आहे.

नाशिकचे बडतर्फ सुधाकर बडगुजर भाजप पक्षात प्रवेश करणार हे जवळपास नक्की झाले आहे. यानिमित्ताने आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्या मुलाचे पुनर्वसन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी भाजपला संभाव्य प्रवेशासाठी माजी नगरसेवकांची यादी दिली आहे.

श्री. बडगुजर यांच्या यादीत माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांचे नाव असल्याचे बोलले जाते. बडगुजर आणि मुशीर सय्यद यांच्याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात गंभीर आरोप केले होते. यावेळी अनेक भाजप आमदारांनी त्यांना समर्थन दिले. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांचे आणि त्यांच्या भूमिकेचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nitesh Rane
Uddhav Thackeray Politics: सोडून गेलेले मुंबई, नाशिकचे काही नेते पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या वाटेवर?

आमदार नितेश राणे यांनी माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी सार्वजनिक जागा बळकावून त्यावर टॉवर बांधल्याचा आरोप केला होता. हे टॉवर आठ दिवसात पाडण्यात यावे अशी त्यांची मागणी होती. या मागणीला विधानसभेचे सभापती यांनी कारवाईचे आदेश देत प्रतिसाद दिला.

श्री बडगुजर हे शिवसेना ठाकरे पक्षात असताना मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील सलीम कुत्ता या आरोपी सोबत त्यांनी पार्टी केली. या पार्टीत त्यांनी सलीम कुत्ता या गुन्हेगारासोबत नृत्य केले. याबाबतचे फोटो झळकावत नितेश राणे यांनी मोठा अभिनिवेश दाखवत बडगुजर यांना गुन्हेगार ठरवले होते.

आमदार राणे यांनी थेट विधानसभेत आवाज उठवत या दोन्ही नेत्यांबाबत आक्षेप घेतले होते. अतिशय आक्रमक पद्धतीने त्यांनी ही भूमिका मांडत संबंधितांना आरोपी ठरविण्याचा प्रयत्न केला. याच नेत्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र केवळ आरोप म्हणून दुर्लक्ष करण्याचा सल्ला देत आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भूमिका पाहता नितेश राणे आता काय करणार? याची नाशिकच्या राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com