NCP leader Amol Mitkari latest statement: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेवर पुन्हा संधी न मिळाल्याबद्दल आपली खंत व्यक्त केली आहे. पक्षाने त्यांच्या जागी झीशान सिद्दीकी यांना संधी दिली असून, मिटकरी यांनी या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, "झीशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे. परंतु, ज्या जागेवर ही नियुक्ती झाली, ती जागा त्यांची स्वतःची होती.
मिटकरी यांचा कार्यकाळ १४ मे पर्यंत असताना आणि ते अद्याप आमदार असताना, त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्यामुळे त्यांना प्रचंड वेदना झाल्या आहेत. पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने किमान एक फोन करून किंवा चर्चेला बोलावून या निर्णयाची कल्पना द्यायला हवी होती, अशी त्यांची अपेक्षा होती."
मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्यांनी सभागृहात नेहमीच शेतकरी, तरुण आणि सामाजिक सलोख्याचे प्रश्न हिरिरीने मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत कोणी चुकीचे विधान केले तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
विशेषतः अजित दादांच्या संदर्भात त्यांनी विचारलेले प्रश्न किंवा त्यांच्यासाठी घेतलेली भूमिका हीच त्यांना डावलण्याचे कारण ठरली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित दादांसाठी लढणे ही जर चूक असेल, तर अशा चुका वारंवार करण्याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
त्यांनी वरिष्ठ नेत्यांवर टीका करताना म्हटले की, एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावलण्याचे कारण स्पष्टपणे सांगायला हवे होते. भौगोलिक आणि सामाजिक योगदान असतानाही त्यांना का नाकारले गेले, याचे उत्तर त्यांना हवे आहे. अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, भविष्यात अशा अनेक संधी येतील आणि त्यांचे वय पाहता अजून २५ वर्षांचे राजकीय जीवन बाकी आहे.
शेवटी मिटकरी यांनी असे स्पष्ट केले की पदे येतात आणि जातात, पण कार्यकर्त्याला विश्वासात न घेणे हे चुकीचे आहे. जर कार्यकर्त्यांची अशीच उपेक्षा झाली, तर पक्षात लोक टिकणार कसे, असा गंभीर प्रश्न त्यांनी या मुलाखतीतून उपस्थित केला आहे. शेवटी, त्यांनी आपली निष्ठा अजित दादांवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
अमोल मिटकरी यांनी काल रात्री ट्विटकरुन केले आहे. मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी २९ जानेवारीलाच केली होती दादा…
हरकत नाही. …दादा तुमच्यासाठी 'एक संधी' काय अशा 'हजार संधी' हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढत आहे आणि उद्याही लढत राहील , या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवणार नाही तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल! अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही,वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेल #जान भी देंगे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.