Congress Sarkarnama
महाराष्ट्र

Amravati Teachers Constituency election: अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! माजी मंत्र्यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात? महायुतीचे गणित बिघडणार!

Amravati Teachers Constituency election News : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात लवकरच निवडणूक होणार आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर रोजी संपणार आहे.

Sachin Waghmare

Amravati News : अमरावती शिक्षक मतदारसंघातील आमदारकीची मुदत डिसेंबर महिन्यात संपणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात या ठिकाणी निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने मोठा डाव टाकला आहे. या मतदारसंघातून माजी मंत्र्यांच्या मुलीला उमेदवारी देत महायुतीचे गणित बिघडवण्याची तयारी केली असल्याचे समजते.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात लवकरच निवडणूक होणार आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लवकरच लागणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या प्रा. आदिती पोहरे यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांच्या प्रा. आदिती पोहरे या सून आहेत. त्यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लवकरच लागणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुतीमधील मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. २०२० च्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी विजय मिळवला होता. तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. तिकीट न मिळाल्यामुळे किरण सरनाईक यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यापूर्वीच आमदार किरण सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची तयारी ते करीत आहेत. दुसरीकडे माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. पण शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या निवडणुकीत जोशी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार होते. त्यामुळे आता शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रा. अदिती पोहरे या माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आहेत. त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा वारसा लाभला आहे. आदिती यांना लहानपणापासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणाचा अनुभव मिळाला आहे. त्यामुळे आदिती यांना विविध प्रश्नांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळाली. याच पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारसंघातील त्यांची संभाव्य उमेदवारीची जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT