Amravati Teachers Constituency : शिक्षकांच्या राजकारणात मोठी राजकीय चाल! डॉ. संगीता शिंदेंनी बांधली खासदार डॉ. अनिल बोंडेंना राखी; आमदारकीची लॉटरी लागणार?

Teachers Constituency Maharashtra News : शिक्षक नेत्या डॉ. संगीता शिंदे यांनी भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. त्यामुळे आता येत्या काळात होत असलेल्या अमरावती शिक्षक मतदारसंघातील राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Anil bonde
Anil bonde Sarkarnama
Published on
Updated on

Amravati News : अमरावती शहरात रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड घडली. त्यामुळे सर्व राजकीय मंडळींचे त्याकडे लक्ष लागले आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने महत्त्वाकांक्षी कौटुंबिक व राजकीय स्नेह पाहायला मिळाला. शिक्षक नेत्या डॉ. संगीता शिंदे यांनी भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. त्यामुळे आता येत्या काळात होत असलेल्या अमरावती शिक्षक मतदारसंघातील राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या या नेतेमंडळींने आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाष्य केले. या वेळी बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले, "संगीता शिंदे या मतदार संघातील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र धडपडत आहेत, असे सांगत या बहिणीला शिक्षक आमदार होण्याचा आशीर्वाद त्यांनी यावेळी दिला. आगामी काळात होत असेलल्या अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याला महत्तव प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठे भाऊ म्हणून शिक्षकांचे प्रश्न समजून घेतात आणि नेहमी मदत करतात, अशी भावना डॉ. संगीता शिंदे यांनी व्यक्त केली. त्यामुळे येत्या काळात शिक्षक नेत्या डॉ. संगीता शिंदे या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार असू शकतात, अशा चर्चा या निमित्ताने रंगल्या आहेत.

Anil bonde
Maharashtra Politics Live Update : कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझे समर्थन नाही : मनोज जरांगे

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 6 शिक्षक मतदारसंघांपैकी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ हा पश्चिम विदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ मानला जातो. या शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश आहे. या निवडणुकीत माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमधील मान्यताप्राप्त शिक्षक आणि प्राध्यापक या निवडणुकीत मतदान करतात. त्यामुळे डिसेंबर 2026 मध्ये होत असलेल्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करीत आहेत.

Anil bonde
Maharashtra Political Live Update: सीबीआयची रायगड जिल्ह्यात मोठी कारवाई; केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात खळबळ

गेल्या दोन-तीन दशकाचा इतिहास पहिला तर भाजप, शिवसेना व काँग्रेसने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे येथे हस्तक्षेप वाढवला. मात्र, शिक्षक मतदारांनी अनेकदा प्रस्थापित राजकीय पक्षांना डावलून अपक्ष किंवा संघटनांच्या प्रतिनिधींना पसंती दिली आहे. माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुखांचे याठिकाणी अधिककाळ वर्चस्व राहिले आहे.

देशमुख यांनी दीर्घकाळ म्हणजेच तब्बल २४ वर्षे व ४ टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. शिक्षकांच्या हक्कांवर विधान परिषदेत थेट आणि आक्रमक आवाज उठवणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. प्रा. श्रीकांत देशपांडे २०१४ च्या निवडणुकीत विजयी झाले तर अपक्ष ॲड. किरण सरनाईक २०२० च्या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या अधिकृत उमेदवाराला धोबीपछाड देत अपक्ष उमेदवार ॲड. किरण सरनाईक विजयी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com