Amruta Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का? असा प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस पटकन म्हणाल्या 'देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते. लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, देवेंद्रजी प्रॅक्टीकल आहेत मी रोमँटिक आहे.'
'त्यांना रोमान्स कळतही नाही आणि जमतही नाही. त्यांना फक्त राजकारण कळतं.', असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.
'धरण उशाला कोरड घशाला हे जे तुम्ही म्हटलं आहे ना, ते ऐकल्या बरोबर देवेंद्रजी झळकतात माझ्या समोर. येतात जातात येतात जातात. दिसतात रोज पण असं पकडून त्यांच्यासोबत वेळ घालवायचा, मस्ती करायची असं करताच येत नाही. ते धरण उशाला असतं आणि कोरड घशाला असती.” असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.
अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांवर चर्चेत येत असतात.सोशल मीडियावर टीका ट्रोल देखील करण्यात येते. अमृता फडणवीस म्हणाल्या मी ट्रोलरकडे लक्ष देत नाही.
एका शोमध्ये अमृता फडणवीस यांनी एका शोमध्ये देवेंद्र फडणवीस एका वेळी 35 पुरणपोळ्या खायचे असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर देखील त्यांना ट्रोल करण्यात आले होते.
वाहिनीवर मुलाखत देताना अमृता फडणवीस यांना धनुष्यबाण की घड्याळ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला दोन्ही आपल्याकडे असल्याचे हसत उत्तर दिले. तसेच मी फिरते तळ्यात नजर माझी मळ्यात देवेंद्र सारखे रत्न पडले माझ्या गळ्यात, असा उखाणा देखील अमृता फडणवीसांनी घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.