jayant Patil News : ... तर अजितदादा महायुतीतून वेगळे लढतील; जयंत पाटलांनी सांगितलं 'हे' कारण

Political News : आगामी निवडणुका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून वेगळा होऊन एकटा निवडणूक लढवेल, अशी शक्यता जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
Jayant Patil, Sharad Pawar, Ajit Pawar
Jayant Patil, Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्रपक्ष एकत्रित लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप, शिवसेनेतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. तिकीट वाटपादरम्यान हा संघर्ष आणखी बळवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे युती आणि आघाडी टिकणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी युती टिकणार नसल्याचे भाकीत केले आहे. आगामी निवडणुका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून वेगळा होऊन एकटा निवडणूक लढवेल, अशी शक्यता जयंत पाटील यांनी व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (jayant Patil News)

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडींवरती बोलताना जयंत पाटील म्हणाले, निवडणूक झाल्यानंतर आपण निवडुन दिलेला आमदार कुठे जाईल, याबाबत सर्वांना चिंता वाटते. भाजप हा 105 आमदारांचा पक्ष हा बाजूला बसला आहे आणि 40 आणि 50 वाले सध्या राज्य करत आहेत. 50 आमदार असणाऱ्यांनी तर संपूर्ण राज्यच वेठीला धरले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे मुंबई दौऱ्यावर आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय झाली आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजपने (Bjp) ज्या दोन आघाड्या केल्या आहेत. त्यामधील पहिल्या आघाडीला काही प्रमाणात नागरिकांनी एक्सेप्ट केले आहे. मात्र जी दुसरी आघाडी करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपची राज्यभरामध्ये विश्वासार्हता कमी झाली आहे. सध्याचे चित्र पाहिले तर पूर्वीप्रमाणे भाजपवर विश्वासार्हता राहिली नसल्याने एखाद्या विधानसभा मतदारसंघात 37% होती ती आता 26. 27% वर आल्याचे पाहायला मिळत आहे.

Jayant Patil, Sharad Pawar, Ajit Pawar
Bhagyshri Ataram News : भाग्यश्री आत्राम यांचं ठरलं! वडिलांविरोधात मुलगी मैदानात, 'या' तारखेला करणार शरद पवारांच्या 'NCP'त प्रवेश

भाजपमधीलच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा ही आघाडी करण्यात आली. त्यामुळे आता कदाचित अजित पवार यांना ते वेगळे लढण्यास सांगू शकतात. त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर ते एकत्रित येतील, अशी शक्यता असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितली.

जयंत पाटील पुढे म्हणाले, 'अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही. त्या दोघांमध्ये अंतर आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मनासारखं महाराष्ट्रात काम करता येत नाही. त्यामुळे त्यांची पंचायत झाली आहे. बाकी दोघे सत्तेसाठीच गेले आहेत. त्यामुळे जनतेने अमान्य केलेलं हे त्रिकुट आहे.'

Jayant Patil, Sharad Pawar, Ajit Pawar
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com