मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांवर सुरवात केली, त्याला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. पण आरोपांच्या फैरी रोज झडत असताना आता एकमेंकांना कायदेशीर नोटीस पाठविण्यास सुरवात झाली आहे. मलिक यांची मुलगी निलोफर मलिक-खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे, तर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी नवाब मलिक (nawab malik) यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
अमृता फडणीस यांच्याबाबत मलिक यांनी टि्वट केलं आहे. ते डिलिट न केल्यास कारवाईचा इशारा नोटीशीतून अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी मलिकांना (nawab malik) दिला आहे. ''४८ तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे टि्वट डिलिट करा, आणि सार्वजनिक माफी मागा, अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा," असा इशारा अमृता फडणवीस यांनी मलिकांना दिला आहे. मानहानी खटल्यासोबत फौजदारी कारवाई करण्याचा इशारा अमृता फडणवीस यांनी या नोटिशीतूनदिला आहे. कलम 499 आणि 500 अंतर्गत कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
मलिकांची मुलगी निलोफर मलिक खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना आज कायदेशीर नोटीस पाठविली आहे. निलोफर यांचे पती आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरात ड्रग सापडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर आरोप केला होता, हा आरोप चुकीचा असल्याचा दावा करत निलोफर यांनी फडणवीस यांच्या विरोधात अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे.
''फडणवीस यांच्यामुळं माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली असून त्याची भरपाई म्हणून त्यांनी ४ कोटी रुपये द्यावेत व माफी मागावी. अन्यथा कोर्टात जावं लागेल,'' असा इशारा निलोफर मलिक यांनी फडणवीसांना दिला आहे.
'नवाब मलिक यांचे जावई हे ड्रग्जसकट सापडले आहेत. ज्यांच्या घरीच ड्रग्ज सापडतं त्यांच्या पक्षाला ड्रग्ज व्यापाराचा सूत्रधार म्हणायचं का? असा सवाल फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. फडणवीस यांच्या या विधानाला निलोफर मलिक यांनी आक्षेप घेतला आहे. फडणवीसांना त्यांनी नोटीस बजावली आहे.
प्रसिद्धीसाठी एकनाथ शिंदेंचा स्टंट ; माओवादी प्रवक्त्याचे पत्र व्हायरल
गडचिरोली : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (shivsena eknath shinde) यांना काही दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. नक्षवाद्यांकडून ही धमकी मिळाली असे सांगण्यात आले होते. शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबियांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, ''शिंदे यांना माओवादी संघटनेने कोणतीही धमकी दिलेली नसून, तो त्यांनीच स्वस्त प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे,'' अशा शब्दात माओवाद्यानी पत्रक (naxalite maoist spokesperson letter) काढून खुलासा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.