मुंबई : माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र,अंडरवर्ल्डचे लोक, ज्यांचे संबंध आहेत, गुन्हेगार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्या लोकांना सरकारी कमिशन आणि बोर्डांचं अध्यक्ष का बनवलं?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. मलिक-फडणवीस यांचं शाब्दीक युद्ध चांगलंच रंगलं आहे. मलिकांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
फडणवीस यांनी प्रसिद्ध नाटककार जॉर्ज बर्नाड शॉ यांचा सुविचार पोस्ट करत मलिकांना प्रत्युत्तर दिलं होतं. कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणइ डुकरालाही तेच आवडत असतं, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली होती.
मलिक म्हणाले, ''फडणवीसांनी बर्नार्ड शॉच्या एका वाक्याचा वापर करून माझ्यावर टीका केली आहे. परंतु आम्ही अशी टीका कोणावरही करत नाही. लोकांना जनावरांची उपाधी देणे ही भाजपची संस्कृती आहे. लोकांना वाटत आहे की नवाब मलिक एकटे पडले आहेत, परंतु त्यांना सांगतो मला शरद पवार, मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा पाठींबा आहे. पूर्णपणे मंत्रिमंडळ सोबत आहेत. मुख्यमंत्री यांनी काल माझं कौतुक केलं. माझे पुतळे जळत आहेत, त्यांना सांगतो की पुतळे जाळत असाल तर जाळा परंतु मी त्यांना आरसा दाखविणार आहे.''
''विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्वीटरवर मला एका जनावराची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नेते नेहमीच प्राण्यांची नावे देत असतात. त्यातून त्यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. भाजपचे नेते माणसाला माणूस समजत नाहीत. माणसाला जनावराची उपमा देणे ही यांची संस्कृती आहे. या उपाधीमुळे आमची इज्जत जात नाही उलट भाजपची काय मानसिकता आहे, हे स्पष्ट होते,'' असेही नवाब मलिक म्हणाले.
मलिक म्हणाले की, गुजरातच्या द्वारका येथे ड्रग्ज सापडले आहेत. मनीष भानुशाली, धवल भानुशाली सुनील पाटील हे गुजरातच्या नोव्हेंटॅल हॉटेल मध्ये राहत होते, त्यांचे किरीटसिह राणा यांच्याशी संबंध आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा ड्रग्ज सापडल्यामुळे यांच्याबाबत संशय निर्माण झाला आहे.
''देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या जावयाबाबत काही आरोप लावले होते यामध्ये ते बोलले होते की समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडले होते. परंतु हे खोटं आहे त्यामुळे आम्ही मानहानीचा दावा दाखल करणार आहोत असं मी बोललो त्यानुसार आज आम्ही नोटिस पाठवली आहे,'' असे मलिक म्हणाले.
''आम्ही देशातील सर्व डीसीपीना विनंती करतो की देशांत कायदा यासाठी बनवण्यात आला होता त्यामुळे ड्रग्जचे व्यवसाय बंद होतील त्यामुळे आता गुजरात सारख्या राज्यातून अशाप्रकारे बाबी समोर येत आहेत त्यामुळे डीसीपी डिजी याबाबत योग्य कारवाई करतील,'' असे मलिक म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.