Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

ShivSena UBT News: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, पक्षाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी

Shivsena UBT News : पक्षाच्या कार्यपद्धतीवर गेल्या काही दिवसापासून नाराज होते. मात्र, आक्षेप घेऊनही बदल होत नसल्याने त्यांनी सर्व पदाचा सोमवारी तडकाफडकी राजीनामा दिला.

Sachin Waghmare

Mumbai News : निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी एकवटली आहे. त्यासाठी दिल्लीत खासदारांनी सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला आहे. दुसरीकडे सीजेपीने आक्रमकपणे दिल्लीत आंदोलन केले आहे. तर मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी ज्ञानेश कुमारांच्या विरोधात रान पेटवले आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या प्रवक्त्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हिंदी चेहरा असे ओळख असलेले बडे नेते आनंद दुबे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीवर आनंद दुबे गेल्या काही दिवसापासून नाराज होते. मात्र, आक्षेप घेऊनही बदल होत नसल्याने दुबे यांनी त्यांच्या सर्व पदाचा सोमवारी तडकाफडकी राजीनामा दिला.

राज्यातील महाविकास आघाडीसाठी (MVA) हा मोठा झटका मानला जात आहे. एकीकडे आंदोलनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये एकजुटीची चर्चा सुरू असतानाच आनंद दुबे यांनी पक्ष प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

निवडणूक आयोग आणि एसआयआरच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या भूमिकेशी मी सहमत नव्हतो. मी कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दर्शवू शकत नाही. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आनंद दुबे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे.

पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना आनंद दुबे म्हणाले, 'राष्ट्रीय मुद्द्यांवर मतभेद असू शकतात परंतु राष्ट्रहित हेच सर्वोपरी असले पाहिजे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, २६ एप्रिल रोजी त्यांनी पक्षाचे सहकारी आणि विधिमंडळ शाखेचे उप-संघटक गुलाबचंद मौर्य यांच्यासमवेत घटनास्थळाला भेट दिली होती. त्यावेळी त्या भागात गोळीबारामुळे तणावपूर्ण परिस्थिती असल्याचे नमूद केले होते. या भेटीदरम्यान त्यांनी फारुख अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन त्यांना पक्षाचा पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT