

Satej Patil News : महायुतीचा गोकुळमधील वाद स्थानिक पातळीवर सुटला नसल्याने सर्वपक्षीय नेत्यांना मुंबई गाठावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तिढा सुटेल, अशी अपेक्षा असताना आता आमदार सतेज पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा मुंबईत देखील सुटत नसल्याने थेट सर्वपक्षीय नेते दिल्लीत जाणार असल्याचा दावा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.
सोमवारी सात तारखेला महायुतीचे सर्व नेते गोकुळ संदर्भात दिल्लीला जाणार असल्याचे मला समजतय. दिल्लीतच यावर चर्चा होईल आणि दिल्लीतूनच निर्णय होईल, असे उपरोधीक टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावत
गोकुळचा निकाल 25-0 होईल असे महायुतीचे लोक म्हणत आहेत. पण ठरावधारकांना इतकं ही गृहीत धरू नका. ते 25 -0 म्हणत असतील तरी मी मात्र दूध उत्पादकाला 25 रुपये ज्यादा दर कसा मिळेल, पशुखाद्याचे दर कसे कमी होतील हा शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतोय, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
गोकुळ मल्टीस्टेट झाला नाही म्हणून आज गोकुळची निवडणूक लागली आहे. गोकुळ मल्टीस्टेट झाला असता तर गोकुळची निवडणूक कधी झाली हे दूध उत्पादकांना देखील कळालं नसतं. आम्ही त्या विरोधात लढा दिला.मात्र तत्कालीन दुग्धविकास मंत्र्यांनी हा दावा करून मोठा गौप्यस्फोट केला आहे. यात तथ्य असेल तर महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवाचा आहे. गोकुळ दूध संघ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोकुळ मध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप त्या वेळेपासूनच होत आहे. आता स्पष्ट होत आहे,असे देखील ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.