Anand Mahindra

 

sarkarnama

महाराष्ट्र

आनंद महिंद्रांनी व्हिडिओ शेअर करीत केलं शिवसेनेच्या मंत्र्याचं कौतुक

तुम्ही आम्हाला महिंद्रा रेसिंग स्पर्धेत हवे आहात. तुम्ही लाल रंगाच्या रेसिंग सूटमध्येही खूप छान दिसाल,'' या टि्वटमध्ये असलेल्या व्हिडिओमध्ये सुभाष देसाई ई-ऑटो चालवताना दिसत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काही दिवसापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनचे (ShivSena) ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी महिंद्रा कंपनीने आणलेल्या ई-ऑटोरिक्षाच्या लॉन्चिंगवेळी रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला होता. ''ई-रिक्षा चालवणं सोपं आहे,'' अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सुभाष देसाई यांचं कैातुक केलं आहे. देसाईंनी ई-रिक्षा चालवित असल्याचा व्हिडिओ त्यांनी रिटि्वट करीत त्यांचे कैातुक केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी देसाईंच्या ड्रायव्हिंगचं कौतुकं केलं. त्यांनी व्हिडिओ शेअर करत एक भन्नाट ऑफर दिली आहे.

आनंद महिंद्रा आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''सुभाषजी तुम्ही आम्हाला महिंद्रा रेसिंग स्पर्धेत हवे आहात. तुम्ही लाल रंगाच्या रेसिंग सूटमध्येही खूप छान दिसाल,'' या टि्वटमध्ये असलेल्या व्हिडिओमध्ये सुभाष देसाई ई-ऑटो चालवताना दिसत आहेत.

महिंद्राने यापूर्वीही राज्यात ई-रिक्षा लॉन्च केली आहे. मात्र, आता लॉन्च करण्यात आलेल्या रिक्षाची किंमत २ लाख ९ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. तर या इलेक्ट्रीक रिक्षावर राज्याकडून ३० हजार रूपयांची सूट देखील दिली जाणार आहे.

पाच हजार कोटींची थेट गुंतवणूक आणि सुमारे ७० हजार जणांना रोजगार देणाऱ्या टाटा रिअॅलिटीच्या आयटी पार्कचे भूमिपूजन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष देसाई म्हणाले, ''राज्य शासनाने उद्योग वाढीसाठी विविध धोरणे आखली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आयटी, आयटीएस धोरणामुळे राज्यात सर्वाधिक डेटा सेंटर्स सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसांत हे प्रमाण अधिक वाढेल,''

''राज्यात गुंतवणुकीला ओघ वाढत आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही इतर राज्यांत जात नाही, आम्ही दुबई, युरोपसारख्या देशांत जातो. करोनाकाळात आम्ही सुमारे दोन लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित केली,'' असे देसाई म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT