शिवसेना कार्यकर्त्यांवर हल्ला, चौघांनी दिली कबुली, कारण गुलदस्त्यात

पालकमंत्री उदय सामंत यांनी जखमी परब विचारपूस करत खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनीही जखमी परब यांची विचारपूस केल्याचे सांगितल्याने या हल्ल्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सांगितले होते.
शिवसेना कार्यकर्त्यांवर हल्ला, चौघांनी दिली  कबुली, कारण गुलदस्त्यात

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांवर शनिवारी जीवघेणा हल्ला झाला होता. यातील हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांनी यश आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याप्रकरणाची दखल घेतली होती. भाजपचे नेते नितेश राणे Nitesh Rane) यांच्या सांगण्यावरुन हा हल्ला झाल्याची चर्चा होती. पण आरोपींनी अद्याप कोणाचेही नाव घेतले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर हल्ला करणारे चौघे हल्ल्यात वापरलेल्या कारसह पोलिसांनी पकडले आहे. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याची कबुली दिली आहे. मात्र हा हल्ला नेमका कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

संतोष परब वर हल्ल्यात वापरलेली इनोव्हा कार (क्रमांक MH 14 - BX - 8326) ही कार फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली.आतील चारही संशयितांना ताब्यात घेऊन ओरोस पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलिस अधिकारी नितीन बगाटे यांनी चारही आरोपींची बंद दरवाज्याआड कसून चौकशी केल्याचे समजते. मात्र, चौकशीचा तपशील समजू शकलेला नाही.

परब यांच्यावरील हल्ला हा आमदार नितेश राणे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी जखमी परब विचारपूस करत खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनीही जखमी परब यांची विचारपूस केल्याचे सांगितल्याने या हल्ल्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सांगितले होते.

शिवसेना कार्यकर्त्यांवर हल्ला, चौघांनी दिली  कबुली, कारण गुलदस्त्यात
आम्ही कोणाची घरे फोडली नाहीत ; उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंना डिवचलं

संतोष परब हे कणकवली शहरातील कनकनगर येथे साक्षी अपार्टमेंटमध्ये राहतात. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातून मोटरसायकलने घराकडे जात असताना घरापासून काही अंतरावर नरडवे रस्त्यावर सिल्वर कलरच्या इनोव्हा गाडीतून अज्ञात आणि त्यांना त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ते खाली पडल्यानंतर गाडीतून उतरलेल्या दोघांनी त्यांच्या छातीत धारदार हत्याराने हल्ला केला. या घटनेनंतर जखमी परब यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांवर हल्ला, चौघांनी दिली  कबुली, कारण गुलदस्त्यात
पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा..धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com