Ujjwala Thite, Rajan Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Angar election update : अनगर निवडणुकीबाबत मोठी अपडेट; राजन पाटलांना धक्का नाही, अधिकाऱ्यांनी सगळं क्लिअर केलं...

Election officer clarification : राजन पाटील यांच्या सुनेला व इतर बिनविरोध झालेल्या उमेदवारांची निवड निश्चित आहे. निवडणूक स्थगितीचा त्यांना कसलाही फटका बसणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Local body elections Maharashtra : राज्यभरात गाजलेल्या अनगर नगपंचायतीची निवडणूक स्थगित करण्यात आल्याने माजी आमदार राजन पाटील यांना धक्का बसल्याचे सांगितले जात होते. निवडणुकीत त्यांच्या सूनबाई आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. मात्र, अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. निवडणूक स्थगित केल्याने ही निवडणूक पुन्हा होणार का, उमेदवारी अर्ज भरण्यापासून संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

निवडणूक निर्णय़ अधिकारी सचिन मुळीक यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना या निवडणुकीचे चित्र स्पष्ट केले आहे. अनगरमध्ये राजन पाटील यांना धक्का बसलेला नाही. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली नाही. आतापर्यंत झालेली निवडणूक प्रक्रिया पूर्वीप्रमाणे कायम राहणार आहे. पुन्हा उमेदवारी अर्ज भरण्यापासूनची प्रक्रिया करावी लागणार नाही.

उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याच्या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांच्याविरोधात म्हणजे प्रशासनाच्या बाजूने निकाल दिला. हा निकाल २३ तारखेनंतर लागला. याबाबत माहिती देताना मुळीक यांनी सांगितले की, निकाल २३ तारखेनंतर म्हणजे २६ तारखेला लागला. २३ तारखेपर्यंतचे निकाल आयोगाने विचार घेतले. त्यामुळे या यादीत आमचे नाव आहे.

आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार १० तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या तारखेपर्यंत कुणीही माघार घेतली नाही तर आम्ही निवडणूक आयोगाला सध्याच्या स्थितीनुसार निवडणूक बिनविरोध घोषित करण्यासाठी परवानगी मागू. सध्याच्या स्थितीत नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांसाठीही प्रत्येक एक-एकच अर्ज आहे, असे मुळीक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता केवळ या निवडणुकीची औपचारिका बाकी आहे. राजन पाटील यांच्या सुनेला व इतर बिनविरोध झालेल्या उमेदवारांची निवड निश्चित आहे. निवडणूक स्थगितीचा त्यांना कसलाही फटका बसणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत काय घडले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली अनगर नगरपंचायतीची निवडणूत बिनविरोध केली होती. सर्व नगरसेवक बिनविरोध निवडणूक आले होते. तर, नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता पाटील या भाजपकडून, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे या मैदानात होत्या.

सरस्वती शिंदे यांनी निवडणुकीतून माघात घेत भाजप उमेदवार प्राजक्ता यांना पाठींबा जाहीर केला होता. तर, उज्वला थिटे यांनी आपल्यावर दबाव टाकला जात आहे, धमकी दिली जात असून उमेदवारी अर्ज देखील भरू दिला जात नसल्याच्या आरोप केला होता. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर गाजली होती. उज्वला यांनी पहाटे येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, त्यांच्या अर्जावर सूचकाचे नाव नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आणि प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदासाटी बिनविरोध निवड झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT