

Parliament live news : उपराष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर सी. पी. राधाकृष्णन हे आज पहिल्यांदाच राज्यसभेत सभापतींच्या आसनावर विराजमान झाले. आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून सभापतींचे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात उपस्थित राहत त्यांचे स्वागत गेले. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह अनेक सदस्यांनीही सभापतींना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर उपसभापतींचे आणि त्यानंतर खर्गेंची भाषण झाले. त्यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिलेले जगदीप धनखड यांची आठवण काढत सरकारवरही निशाणा साधला. तसेच पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पहिल्या भाषणातील काही मुद्देही त्यांनी सभागृहात वाचून दाखविले.
खर्गे म्हणाले, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तुमचे नाव सारखेच आहेत. तुमचे विचारही त्यांच्यासारखेच असतील, अशी आशा आहे. मी तुम्हाला आव्हान करती की, तुम्ही तुमच्या आसनावरून त्या बाजूला फारसे बघू नका, तिकडे धोका आहे. तुम्ही इकडे पाहिले नाही, तरी धोका आहे. तुम्ही दोन्ही बाजूला संतुलन ठेवले, तर चांगले होईल.
धनखड यांना अचानक द्यावा लागलेला राजीनामा पूर्णपणे अनपेक्षित होता. त्यांचे अचानकपणे निघून जाणे हे सांगावे लागत आहे, जे संसदीय इतिहासात अभूतपूर्व आहे. राज्यसभेचे सभापती हे संपूर्ण सभागृहाचे संरक्षक असल्याने, ते सरकारइतकेच विरोधी पक्षाचेही आहेत. सभागृहाला त्यांना निरोप देण्याची संधी मिळाली नाही, हे पाहून मी निराश झालो, असे खर्गे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी खर्गे यांच्या या विधानावर बोट ठेवले. खर्गेंच्या विधानावर आक्षेप घेत ते म्हणाले, तुम्ही माजी सभापतींबद्दल चुकीच्या भाषेचा वापर केला, त्यांना हटविण्यासाठी नोटीस दिली. हे विसरलात का. आसनाची प्रतिष्ठा तुम्ही अनेकदा मलीन केली. त्यामुळे अशा कोणत्या गोष्टीचा संदर्भ देऊ नका, असे रिजिजू यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेतील कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विरोधकांकडून सभागृहात एसआयआरवर चर्चेची मागणी केली जात आहे. मात्र, अध्यक्षांकडून त्याला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर २० मिनिटांतच दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.