Anil Deshmukh Devendra Fadnavis  sarkarnama
महाराष्ट्र

Anil Deshmukh News : अनिल देशमुखांनी पुन्हा टाकला फडणवीसांवर बॉम्ब

Rajesh Charpe

Nagpur News : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी चार खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून द्या. तुमच्यावर कुठलीच कारवाई करणार नाही. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला पाठवले होते, असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी केला. मी प्रतिज्ञापत्र भरून दिले असते तर तीन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असते असेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण गृहमंत्री होतो. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सांगण्यावरून तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना माझ्यावर शंभर कोटींचा खोटा आरोप करायला सांगितले होते. या दरम्यान फडणवीस यांनी त्यांचा अत्यंत विश्वासू माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझे आणि फडणवीस यांचे फोनवरून बोलणे करून दिले. त्यानंतर अनेकदा तो माझ्याकडे आला. प्रत्येक वेळी त्याने माझे आणि फडणवीस यांचे फोनवरून बोलणे करून दिले, असे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सांगितले. (Anil Deshmukh News)

एकदा फोनवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी काही कागदपत्रे तुमच्याकडे पाठवतो ती जरा पाहून घ्या. पुन्हा तो जवळचा व्यक्ती ती कागदपत्रे घेऊन आला व त्याने माझे त्याच्या मोबाईलवरून फडणवीस यांच्याशी बोलणे करून दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे कागदपत्र मी पाठविले आहेत त्या चार मुद्यानुसार आपण प्रतिज्ञापत्र करून द्या. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गृहमंत्री म्हणून मला त्यांच्या वर्षा सरकारी निवासस्थानी बोलावले. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यासाठी मला पैशांची गरज आहे. आपण मला तीनशे कोटी रुपये जमा करून द्या, असा खोटा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर लावायचा व त्याचे प्रतिज्ञापत्र करुन द्यायचे असे सांगितले होते.

उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व तत्कालीन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान अडकवण्यासाठी सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालीयान हिच्या पार्टीला आदित्य ठाकरे गेले होते. तिथे आदित्य ठाकरे यांनी ड्रिंक घेतल्यावर दिशावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड करायला सुरुवात केली तेव्हा आदित्य यांनी तिला बाल्कनीतून खाली फेकले. त्यात तिचा मृत्यू झाला, असा खोटा आरोप प्रतिज्ञापत्राद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर करावा.

तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील कार्यालयात मंत्री म्हणून मला बोलवून घेतले. तिथे त्यांचा मुलगा पार्थ पवार देखील होता. दादांनी सांगितले महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याचा मोठा धंदा आहे. त्यांच्याकडून आपल्याला पैसे वसुली करायची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे वसुलीचे काम पार्थ पवार करतील. तुम्ही फक्त गृहमंत्री म्हणून त्यांना मदत करा, असा खोटा आरोप अजितदादा यांच्यावर करायला लावला.

याच प्रतिज्ञापत्रात तत्कालीन मंत्री अनिल परब यांचे दापोलीच्या साई रिसॉर्टमध्येच पैसे लागलेले आहेत. सर्व पैसे त्यांचेच आहेत. फक्त कागदोपत्री मालकी सदानंद कदम यांची दाखवण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तक्रारीवर गृहमंत्री म्हणून त्यांना मदत करा, असा आरोप मला अनिल परब यांचावर प्रतिज्ञापत्रातून करायला सांगितला होता, असे आज माध्यमांसोबत बोलताना अनिल देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT