Congress Politics: हिरामण खोसकर यांना मोठा झटका! काँग्रेसकडून कारवाईचे संकेत

Hiraman Khoskar MLC Election cross voting : विधान परिषद निवडणुकीत आमदार खोसकर यांनी पक्षाचा आदेश डावलत प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला, असा आरोप करण्यात आला होता.
Hiraman Khoskar
Hiraman KhoskarSarkarnama
Published on
Updated on

Congress cross Voting : विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगचे प्रकरण काँग्रस पक्षाने गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग संशय असलेले आमदार हिरामण खोसकर यांचे राजकीय भवितव्य संकटात सापडले आहे.

आमदार खोसकर यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडे अर्ज दाखल केला. मात्र, महाराष्ट्रातील क्रॉस व्होटिंग काँग्रेस हायकमांडने अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. पक्ष या बंडखोर आमदारांवर कठोर कारवाई करणार आहे, असे वरिष्ठांनी स्पष्ट केले.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आमदार खोसकर यांनी पक्षाचा आदेश डावलला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. या प्रकरणाने काँग्रेस पक्षाची मोठी नाचक्की झाली होती. त्यामुळे क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर काय कारवाई होते याची उत्सुकता होती. याबाबत अद्याप कारवाई झाली न झाल्याने हा विषय मागे पडेल असे वाटत होते.

Hiraman Khoskar
Congress In Ahmednagar : काँग्रेसच्या डोळा नगर शहर मतदारसंघावर; महासंकल्प मेळाव्यातून दावा ठोकणार

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या दौऱ्यापासून आमदार खोसकर अलिप्त राहिले. त्यातूनच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शंकेची पाल चुकचुकली होती. आज (बुधवारी) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर गंभीर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.

यामध्ये इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्यावर कारवाई होणारच, असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. थोरात यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आमदार हिरामण खोसकर यांची राजकीय कारकीर्द संकटात सापडली आहे.

गेली दोन आठवडे हा विषय चर्चेत होता. त्यामुळे आमदार खोसकर यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत काँग्रेस प्रक्षश्रेष्ठींवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. आमदार खोसकर यांनी गेले काही दिवस ज्या पद्धतीने वाटचाल सुरू केली होती त्यावरून बरेच काही स्पष्ट झाले होते.

एकीकडे काँग्रेसवर दबाव निर्माण करायचा दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करून पुढच्या वाटचालीचे संकेत देणे हे सर्वच आमदार खोसकर यांच्या अंगलट आले आहे.

(Edited By Roshan More)

Hiraman Khoskar
Vijay Wadettiwar On Ajit Pawar News : 'बेटा अजित कितना खाया, सरदार..' ; विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर साधला निशाणा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com