Anil Deshmukh Antilia Case Sarkarnama
महाराष्ट्र

Anil Deshmukh Antilia Case : 'अँटिलिया स्फोटके' प्रकरणाचा मास्टरमाईंड परमबीर सिंह? अनिल देशमुखांचा गंभीर दावा, NIAलाही थेट सवाल

Anil Deshmukh revives allegations against Parambir Singh as NIA court frames charges in Antilia and Mansukh Hiren cases : मुंबई उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा उल्लेख करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले; दरम्यान, सचिन वाझेसह आरोपींवर विशेष NIA न्यायालयात आरोप निश्चित.

Pradeep Pendhare

Anil Deshmukh alleges Parambir Singh Antilia case : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या गाजलेल्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टमध्ये देशमुख यांनी या प्रकरणाचा मास्टरमाईंड परमबीर सिंह असल्याचा दावा करत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अनिल देशमुख यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, अँटिलिया स्फोटक प्रकरणात तत्कालीन मुंबई पोलिस (Mumbai Police) आयुक्त परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले होते. त्यामुळेच त्यांची मुंबई पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर सूडबुद्धीनेच परमबीर सिंह यांनी आपल्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीचा आरोप केल्याचा दावाही त्यांनी केला.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मते, नंतर या प्रकरणाचा तपास NIA कडे गेल्यानंतरही तपासात परमबीर सिंह यांची भूमिका समोर आली होती. या कटाची आखणी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातच झाली होती आणि त्याबाबत अनेक अधिकाऱ्यांच्या जबाबांमध्येही उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला.

याच संदर्भात देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयातील निरीक्षणाचाही उल्लेख केला. या प्रकरणातील एका आरोपीला जामीन देताना न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी 'परमबीर सिंह यांना आरोपी का करण्यात आले नाही?' असा प्रश्न उपस्थित करत NIAच्या तपासावर ताशेरे ओढल्याचे देशमुख यांनी नमूद केले. "एवढे सर्व समोर आल्यानंतरही NIAने परमबीर सिंह यांना आरोपी का केले नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

वाझे, शर्मासह इतर आरोपींवर दोषनिश्चिती

दरम्यान, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष NIA न्यायालयाने शनिवारी माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणात हत्या तसेच बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत खटला चालवला जाणार आहे.

प्रकरणातील आरोपी

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती चकोर बाविस्कर यांनी आरोप निश्चित केले. यावेळी सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींनी न्यायालयात स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये रियाझुद्दीन काझी, सुनील माने, विनायक शिंदे, आनंद जाधव, सतीश तिरुपती मोठकुरी, मनीष वसंतभाई सोनी, नरेश गौर आणि संतोष शेलार यांचा समावेश असून, काझी, माने आणि शिंदे हे माजी पोलिस कर्मचारी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT