devendra fadnavis sachin waze anil deshmukh.jpg sarkarnama
महाराष्ट्र

Video Anil Deshmukh : वाझेचे आरोप अन् अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, देवेंद्र फडणवीस...

Sachin Waze Vs Anil Deshmukh : सचिन वाझेनं अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. यातच अनिल देशमुख यांनी सचिन वाझेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Akshay Sabale

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर स्फोटक ठेवणे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

'अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घेत होते. याबद्दल मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे,' असं म्हणत वाझेनं ( Sachin Waze ) एकच खळबळ उडवून दिली आहे. सचिन वाझेच्या आरोपांना माजी गृहमंत्री देशमुख यांनी प्रत्युत्तर देत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

"सचिन वाझेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर आरोप लावत आहेत," असा आरोप अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

सचिन वाझेनं काय म्हटलं?

"माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. ते ( अनिल देशमुख ) स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे मी 'सीबीआय'कडे दिले आहेत. याच प्रश्नी मी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. फडणवीस यांना अनिल देशमुख यांच्याबाबतचे सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को टेस्टला तयार आहे. फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव आहे," असं सचिन वाझे म्हणाला.

देशमुखांचा फडणवीसांवर बाण...

यानंतर अनिल देशमुख यांनी म्हटलं, "उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरूंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव पाठविला होता. ही गोष्ट मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली. त्यामुळे सचिन वाझे जे बोलला ती देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल आहे."

"दोन खुनांच्या गुन्ह्यात वाझेला अटक करण्यात आली होती. आताही एका खुनाच्या गुन्ह्यात तो अटकेत आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हे स्वरूपाची असून तो विश्वासार्हता ठेवण्यासारखा नाही, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना कदाचित माहिती नसेल. सचिन वाझेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर आरोप लावत आहेत," असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT