Pune News : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिद घेत (ता. 4) मंत्री धनंजय मुडे यांच्यावर पुरव्यानिशी आरोप केले. तसेच मुंडे महायुती सरकारमध्ये कृषिमंत्री असताना कृषी खात्याची अब्रू वेशिला टांगली गेल्याचा दावा करताना मुडे यांनी घोटाळ्याचा धडाकाच लावल्याचे सांगितले आहे. तर एकामागून एक असे घोटाळ्यांचा तपशील देताना मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही? असा सवाल केला आहे. तसेच या प्रकरणात जे अधिकारी सहभागी होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दमानिया यांनी, धनंजय मुंडेंबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट करताना, ते इतके महान कृषिमंत्री आहेत. ज्यांनी फक्त एकाच वर्षात पदावर राहून अफाट पैसा खाल्ला. अशा माणसाला मंत्रिपदावर ठेवण्याची गरज आहे का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
दमानिया यांनी कृषी विभागात नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅगांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. नॅनो युरिओ आणि नॅनो डीएपी या इफको कंपनीच्या असून मुंडे यांच्या काळात नॅनो एरियाचा 184 पर लिटर दर असतानाही ती 220 रुपयात घेतल्याचा दावा केला आहे. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली 19 लाख 68 हजार बॉटल खरेदी या 220 रूपयांनी गेतल्या गेल्या. ज्या दुपटीपेक्षा जास्त किंमतीने घेतल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.
तसेच नॅनो डीएपी, याची किंमत 522 रुपये एक लिटर असून ते फक्त 269 रुपयाला मिळते. त्याही बॉटल 19 लाख 57 हजार घेण्यात आल्या. ज्याची बाजारभाव किंमत 269 रूपये होती. पण ती 590 रुपयाला खरेदी केली. अशा प्रकारे नॅनो युरिओ आणि नॅनो डीएपीमध्ये 88 कोटींचा घोटाला झाल्याचे दमानिया यांनी म्हटलं आहे.
बॅटरी स्पेअरमध्ये देखील असाच मोठा घोटाळा झाला असून एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर 2450 मिळतो. तोच एमएआयडीच्या वेबसाईटवर 2946 दिला जात आहे. तर याची बॅटरी 3426 विकत घेतल्या आहेत. मुंडेंनी 2 लाख 36 हजार 427 बॅटरी स्पेअर घेतल्याचा दावा दमानियांनी केलाय.
तर गोगलगायीचा प्रादूर्भाव झाल्याने कापूस आणि सोयीबीनचं नुकसान टाळण्यासाठी मेटाल्डे हाइडमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला आहे. जर मेटाल्डे हाइड बल्कमध्ये घेतले तर ते स्वस्त मिळतं. पण कृषी मंत्र्यांनी ते 1275 रुपयाला विकत घेतलं. एकूण 1 लाख 96 हजार 441 किलो विकत घेतलं. कॉटन स्टोरेज बॅग 6 लाख 18 हजार घेतल्या. ज्या फक्त 577 ला मिळतात. पण आपल्या महान कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली याच बॅग 1250 रुपयाला घेतल्या.
अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या 1 हजार कोटीमधील 342 कोटींच्या टेंडरमध्ये 160 रुपये सरळ सरळ गेल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. एकच वर्षात आपल्या महान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रिपदावर ठेवण्याची सरकारला गरज आहे का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.