Anjali Damania-Dhananjay Munde sarkarnama
महाराष्ट्र

Anjali Damania News :'त्यात तुमचीच अब्रु जाईल...', अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले

Anjali Damania on Dhananjay Munde Defamation Case Filing : धनंजय मुंडे यांनी ट्विट करत अंजली दमानियांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.त्याला दमानिया यांनी उत्तर दिले आहे.

Roshan More

Anjali Damania News : अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.त्याला मुंडेंनी उत्तर दिले होते. मात्र, अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत मुंडेंवर आरोप केले. त्याविरोधात धनंजय मुंडे यांनी ट्विट करत अंजली दमानियांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

अब्रु नुकसानीच्या खटल्यावर अंजली दमानिया यांनी मुंडे यांना चॅलेंज दिले आहेत. दमानिया म्हणाल्या की, 'तुम्ही जे पत्रकार परिषदेत बोलला त्यातील एकुणएक गोष्ट खोटे असेल तर ते मला दाखवणं आणि पुरावे सादर करणे हे माझं काम आहे. त्यामुळे मी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतील. तुम्हाला जे करायचे आहे तु खुशाल करा त्यात आब्रु तुमची जाईल माझी नाही.'

दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचे ट्विट रिट्विट करत म्हटले आहे की, 'धनंजय मुंडे आपल्याला अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर आपण खुशाल करा, ह्यात तुमच्यावरच कोर्ट ताशेरे ओढेल ह्यात मला काडीमात्र शंका नाही. मी वकील पण लावणार नाही, स्वतः ही केस हायकोर्टात लढेन.'

धनंजय मुंडे काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटले की, 'अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT