Devendra Fadnavis News : वर्षा बंगल्यात राहायला का जात नाही? फडणवीसांनी केला खुलासा, दिवसही सांगितला...

Varsha Bungalow Chief Minster House Latest Update : वर्षा बंगल्यात रेड्याची शिंगे पुरल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.
Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन बराच कालावधी उलटला तरी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात राहायला का जात नाही, याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. टोपलीभर लिंबं, काळी जादू अशी बरीच चर्चाही त्यावरून झाली. बंगला पाडणार असल्याचा दावाही काही जणांनी केला. पण आता खुद्द फडणवीस यांनीच याबाबत खुलासा केला आहे.

वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आहे. फड़णवीस यांनी शपथ घेऊन दोन महिन्यांचा काळ उलटला तरी अद्याप या बंगल्यात राहायला गेलेले नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याबाबत मोठा दावा केला होता. या बंगल्यात रेड्याची शिंगे पुरल्याचा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोपही झाले.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांना 'होम ग्राऊंड'मध्येच धक्का? कंत्राटदारांनी घेतला मोठा निर्णय

बंगला पाडण्यात येणार असल्याचा चर्चाही सुरू आहेत. त्यावर एका मुलाखतीमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, आज मी एका चॅनेलवर पाहत होतो, वर्षा पाडणार? अरे काय वेड्यांचा बाजार आहे, की कुणाच्या घरची मालमत्ता आहे. असे आहे की, शिंदेसाहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्याठिकाणी मला जायचे आहे. त्यापूर्वी काही छोटी-मोठी कामे तिथे सुरू होती.

माझी मुलगी दहावीत आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे ती म्हणाली, माझी परीक्षा झाल्यानंतर तिथे शिफ्ट होऊ. म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर जाईन. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा, मला तर वाटते, माझ्या स्तराच्या माणसांनी अशाप्रकारच्या चर्चांना उत्तरही देऊ नये, अशा या चर्चा आहेत. त्यामुळे मला वाटतं एवढं उत्तर पुरेसं आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Dr Babasaheb Ambedkar Death : आंबेडकरांच्या मृत्यूला कोण जबाबदार? राज्यसभेत अनिल बोंडेंचा मोठा दावा

काय म्हणाले होते संजय राऊत?  

वर्षा बंगल्याबाबत मोठा दावा करताना संजय राऊत म्हणाले होते की, भाजपच्या वर्तुळात चर्चा आहे की, बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंगे पुरली आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये अशी कुजबुज आहे. मंदिरातून आणलेली शिंगे मंतरलेली आहेत. दुसऱ्या मुख्यमंत्र्यांचे पद टिकू नये, यासाठी ही शिंगे पुरली आहेत. त्यामुळे फडणवीस राहायला जात नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com