Anjali Damania Namdev Shastri  sarkarama
महाराष्ट्र

Anjali Damania Video : संतोष देशमुखांच्या भावासोबतच नामदेव शास्त्रींकडे अंजली दमानिया पाठवणार पुरावे, म्हणाल्या, 'आम्ही धनंजय मुंडेंच्या विरोधात...'

Anjali Damania sends evidence to Namdev Shastri : भगवान गडावर नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना पाठींबा दिला. धनंजय मुंडे हा 100 टक्के गुन्हेगार नाही हे मी सांगू शकतो, असे ते म्हणाले होते.

Roshan More

Anjali Damania News : भगवान गडावर नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना पाठींबा दिला. धनंजय मुंडे हा 100 टक्के गुन्हेगार नाही हे मी सांगू शकतो. खंडणीवर जगणारा तो नाही. तो जो जर आमच्या क्षेत्रात असता तर संतपदाला पोहोचला असता, असे नामदेव शास्त्री म्हणाले. त्याच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आवाज अडवणाऱ्या आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या यांनी नामदेव शास्त्री यांना मुंडेंच्य विरोधातील पुरावे पाठवणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याकडे हे पुरावे आपण दिले असून ते नामदेव शास्त्री यांना देणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले.

अंजली दमानिया म्हणाल्या, 'काल मी नामदेव शास्त्रींना काही माध्यमांना मुलाखती दिल्या. त्या मी पाहिल्या. त्यामध्ये सुरुवातीच्या काही वाक्यांमध्येच ते म्हणाले की धनंजय मुंडेंचे डोळे पाहिले. अंतकरण मी पाहिले. पण मी सांगतो की आम्ही धनंजय मुंडे या व्यक्तीविरोधात लढत नाहीये. मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून केलेल्या गुन्हे जे त्यांच्या हातून घडले त्याच्या विरोधात आम्ही पुराव्यानीशी बोलतोय.'

'आम्ही यांचे पुरावे पाहिले. नंतर आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहार शोधले, त्यांचे बॅलेन्सशिट पाहिले आणि केलेल्या दहशतीचे पुरावे पाहिले, बंदुकांचे फोटो पाहिले, वीडियो पाहिले. मी एसपी ना, एडीजी, डीजी, मुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना भेटले आणि मुंबई हाई कोर्ट च्या चीफ जस्टिस यांना पुरावे सादर केले.', असे दमानिया यांनी ट्विट करत म्हटले आहे.

नामदेव शास्त्री यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये पुढे दमानिया यांनी म्हटले आहे की, 'दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्याला उद्या भेटायला येणार आहेत त्यांच्या बरोबर मी हे पाठवत आहे. कृपया ते पहावे ही विनंती आणि…'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT