Prakash Ambedkar Devendra Fadnavis manoj jarange patil  sakarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : '...म्हणून जरांगेंना देवेंद्र फडणवीस जेलमध्ये टाकत नाहीत', प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण

Roshan More

Prakash Ambedkar News : मराठा आरक्षणासाठी ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना भाजपचे समर्थन आहे की विरोध हे त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण नाही, तर नौटंकी आहे. जरांगे यांनी शिव्या दिल्या की, फडणवीस ओबीसींना येऊन सांगतात की बघा हा मला शिव्या देतो. कंबरेखालची भाषा वापरतो. पण ते जरांगेंना जेलमध्ये टाकणार नाहीत. कारण, जरांगे यांना जेलमध्ये टाकले तर त्यांना ओबीसींकडे जाता येणार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना खालच्या भाषेत बोलतात. तरीही देवेंद्र फडणवीस आणि भाजप त्यांना काही बोलत नाही. ओबीसींना वाटते की फडणवीस आपला नेता आहे. हे फसवं राजकारण आहे , असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आरक्षण बचाव यात्रे दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सोबत काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली.

निवडणूक होईपर्यंत राजकीय पक्षांना आरक्षणावर तोडगा काढणार नाहीत. आरक्षणाच्या प्रश्नाला हे असेच झुलवत ठेवतील. पण आपल्याला मात्र सावध व्हायचे आहे. राजकीय मतभेद जेव्हा सामाजिक मतभेद होतात, तेव्हा द्वेषाचे वातावरण तयार होते. राजकीय पुढारी आपल्याला झुलवत ठेवत आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

ओबीसींचे 100 आमदार निवडून आणल्याशिवाय आपण आरक्षण वाचवू शकत नाही. आरक्षण वाचवण्यासाठी राजकीय ओळख निर्माण केली पाहिजे. आणि ते करण्यासाठी ओबीसी म्हणून एकत्र आले पाहिजे. असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले.

शरद पवार डिझेल टाकतायेत

शरद पवार यांच्यावर देखील आंबेडकर यांनी निशाणा साधला.राज्यात जे वातावरण पेटले आहे, ते शांत करण्यासाठी शरद पवारांना पाणी टाकायचं नाही, तर डिझेल आणि पेट्रोल टाकून त्याचा भडका करायचा आहे. अशा नेत्यांपासून सावध रहा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT