Arvind Kejriwal Sarkarnama
महाराष्ट्र

Arvind kejriwal Video: नरेंद्र मोदीं सलग 7 दिवस महाराष्ट्रात, अरविंद केजरीवालही विरोधात उतरणार?, 'या' दोन पक्षांचा करणार प्रचार

Modi vs Kejriwal in Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी 29 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर खरी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग सात दिवस सात नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रात प्रचार करणार असल्याची माहिती आहे.

Roshan More

Arvind Kejriwal News: विधानसभा निवडणुकीसाठी 29 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर खरी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग सात दिवस सात नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रात प्रचार करणार असल्याची माहिती आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष महाराष्ट्रात विधानसभा लढत नाही. मात्र, तरी देखील केजरीवाल महाविकास आघाडीतील दोन पक्षांचा प्रचार करणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात आपल्या पक्षासाठी प्रचारसभा घ्याव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांच्यांशी संपर्क करण्यात आल्याची माहिती आहे.

'आप'कडून ते महाराष्ट्र विधानसभा तसेच झारखंड विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अरविंद केजरीवाल हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रचार करणार असून विभागानिहाय त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत केजरीवालांचा आप पक्ष काँग्रेसच्या विरोधात लढता होता. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील आप स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे तेथे देखील काँग्रेस विरुद्ध आप असा मुकाबला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT