BJP News : सर्वच पक्षात आमदारांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा लागली आहे. आमदारांना आयात करून त्यांना थेट विधानसभेचे तिकीट दिले जात आहे. मात्र, यास चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार अपवाद ठरले आहेत. हे बघता त्यांना पुन्हा अपक्ष लढावे लागणार असल्याचे दिसून येते.
आमदार जोरगेवार यांच्या भाजप (Bjp) प्रवेशाला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांचा विरोध आहे तर लोकसभेत महायुतीचे काम केल्याने चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचाही त्यांच्या नावाला विरोध आहे. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने शब्द देऊनही तिकीट नाकारल्याने जोरगेवार यांनी बंड केले होते. यात ते यशस्वीसुद्धा झाले होते. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे.
अपक्ष निवडून येण्याची शाश्वती नसल्याने त्यांनी सुरुवातीला भाजपमध्ये जाण्याच्या निर्णय घेतला होता. चंद्रपूरमधील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांच्यासोबत त्यांचे सूर जुळले नाहीत. सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी ताणून धरले होते. भाजपच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी महायुतीचे उमेदवार मुनगंटीवार यांना पाठिंबा जाहीर केला होता.
तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध करणे सुरू केले. मुनगंटीवर यांचीसुद्धा मनापासून इच्छा नव्हती. हे बघता त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आपला मोर्चा वळवला.
शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. हे कळताच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध करणे सुरू केले. लोकसभेच्या निवडणुकीत जोरगेवार यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात काम केले होते. त्यांना प्रवेश कसा काय द्यायचा ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचेही दार त्यांच्यासाठी बंद झाले आहे. हे बघत आमदार जोरगेवार यांना पुन्हा अपक्ष लढण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.