Congress Party  Sarkarnama
महाराष्ट्र

Congress Party : आमदारकीसाठी 1400 जणांची काँग्रेसकडे 'फिल्डिंग'

Pradeep Pendhare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपपेक्षा काँग्रेसला 'अच्छे दिन' आले आहेत. राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींची उंचावलेली प्रतिमा आणि 2024 च्या लोकसभेत काँग्रेसने मिळवलेले यश!

याचाच परिणाम म्हणून, काँग्रेस विधानसभा निवडणुकीकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याचे दिसते. काँग्रेसने तब्बल 1400 पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी मागितली आहे.

भाजपने 2014 मध्ये राजकारणात राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आगमन केले. हे आगमन करताना भाजपने काँग्रेसची दाणादाण उडवली. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे काँग्रेस पुरती घायाळ झाली. त्यामुळे विरोधी पक्षनेता पद देखील काँग्रेस मिळवता येईल, एवढ्या जागा देखील 2014 आणि 2019 मध्ये मिळवता आल्या नाहीत. मात्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 2019 पासून काँग्रेसने पुन्हा जोरदार कमबॅक केले. लोकसभा 2024 मध्ये काँग्रेसने देशात 99 जागांवर यश मिळवले. सत्ताधाऱ्यांनी पेरलेल्या अनेक अडथळ्यांवर मात करून मिळालेल्या या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 30 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. यात काँग्रेस (Congress) 'मविआ'त मोठा भाऊ झाला आहे. 17 पैकी 17 जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. काँग्रेसने राज्यात सर्व्हे केला असून, यात 80 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस मोठा भाऊ होऊ शकतो, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

काँग्रेसचा 'मविआ'त 135 जागांसाठी प्रस्ताव

राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी वाढली आहे. तब्बल 1400 पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यात मराठवाडा आणि विदर्भातून सर्वाधिक इच्छुका आहेत. 2019 मध्ये काँग्रेसकडे अवघ्या 476 जणांनी उमेदवारी मागितली होती. आता उमेदवारीच्या मागणीत तीनपट वाढ झाली आहे. मविआमध्ये काँग्रेस 100 प्लस जागांवर दावा आहे. काँग्रेसकडून 135 जागांचा प्रस्ताव आहे. प्रत्यक्षात वाट्याला किती येतात, यावर बरच काही गणिते अवलंबून आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फुटीचे ग्रहण

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे सात मते फुटली. ही आमदार चर्चेत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसंच काही आमदार शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आणि भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT