MP Asaduddin Owaisi-Imtiaz Jaleel Sarkarnama
महाराष्ट्र

AIMIM News : ओवेसी संभाजीनगरात, आज घेणार मोठा निर्णय..

Asaduddin Owaisi will take a big decision today : इम्तियाज जलील यांचा पराभव झाला असला तरी शहरातील पुर्व, मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात पक्षाला मिळालेले मताधिक्य दिलासा देणारे होते. या शिवाय ग्रामीण भागातूनही इम्तियाज जलील यांना चांगले मतदान झाले होते.

Jagdish Pansare

AIMIM Maharashtra News : एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यात भाजप महायुतीचा पराभव करायचा असले तर आम्हाला महाविकास आघाडीसोबत घ्या, असा प्रस्ताव एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिल्याचा दावा केला होता.

महाविकास आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांनी आपल्याशी फोनवरून चर्चा करत आम्ही लवकरच तुम्हाला कळवू, असेही सांगितले होते. परंतु त्यानंतर काहीच निरोप आला नाही, आता आम्ही आणखी वाट पाहणार नाही, असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) संभाजीनगरात येतील त्यादिवशी आम्ही आमच्या इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप करू, असे इम्तियाज यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीने एमआयएमकडून आम्हाला सोबत घेण्यासंदर्भात कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्ट करत इम्तियाज जलील यांचा दावा फेटाळला होता. या संपुर्ण घडामोडी पाहता असदुद्दीन ओवेसी हे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका कार्यक्रमासाठी शहरात आलेले ओवेसी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते महाविकास आघाडीकेड एमआयएमने खरंच प्रस्ताव पाठवला होता का ? त्यांच्या कोणत्या नेत्याशी इम्तियाज जलील किंवा ओवेसींची चर्चा झाली ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतील अशी अपेक्षा आहे.

लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचा पराभव झाला असला तरी शहरातील पुर्व, मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात पक्षाला मिळालेले मताधिक्य दिलासा देणारे होते. या शिवाय ग्रामीण भागातूनही इम्तियाज जलील यांना चांगले मतदान झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील काही मतदारसंघात एमआयएम उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्वतः इम्तियाज जलील यांना ओवेसींनी विधानसभेची तयारी करण्यास गेल्या दौऱ्यातच सांगितले होते. आता ते पुर्वमधून लढतात की मध्य ? याबद्दलची स्पष्टताही ओवेसी करतात का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमकडे असलेली व्होट बॅंक महाविकास आघाडीकडे वळली. याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तीनही पक्षाला झाला होता.

एमआयएमसाठी ही चिंतेची बाब ठरत होती, त्यामुळे आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, असा एमआयएमचा आग्रह होता. मात्र महाविकास आघाडीला चौथा भिडू नको आहे. संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्यात एमआयएम किती जागा लढवणार यावरही ओवेसी भाष्य करू शकतात. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ओवेसींचा हा दुसरा संभाजीनगर दौरा आहे. इम्तियाज जलील गेल्या निवडणुकीत खासदार झाल्यानंतर पक्षाची स्थिती जिल्ह्यात सुधारली होती.

ग्रामीण भागातही पक्षाने आपले जाळे विस्तारले होते, पण इम्तियाज यांच्या पराभवाने पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होऊ नये, यासाठी ओवेसी प्रयत्न करत आहेत. या शिवाय एमआयएमकडे वळलेला मतदार टिकवून ठेवण्यासाठी ओवेसी-इम्तियाज यांनी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीने दुर्लक्ष केल्यानंतर आज ओवेसी स्वबळावर लढण्याची घोषणा करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT