Asha Bhosle Death News Sarkarnama
महाराष्ट्र

Asha Bhosle Death: आशाताईंनी सहा महिन्यापूर्वी केलेली मागणी आता फडणवीस पूर्ण करणार; मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra government on Asha Bhosle Music Academy: ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईत आशा भोसले संगीत अकॅडमी सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे जागेची मागणी केली होती.

Mangesh Mahale

गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना गर्दी केली आहे. संगीत, राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहीली आहे.

आशा भोसले यांचे राहिलेले अपूर्ण स्वप्न करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत आशा भोसले संगीत अकॅडमी सुरू करण्याच्या निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईत आशा भोसले संगीत अकॅडमी सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे जागेची मागणी केली होती. त्यांची ही मागणी मान्य करून राज्य सरकारने म्हाडाच्या मुंबई मंडळाला जागेचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने वांद्रे – अंधेरीदरम्यान जागेचा शोध सुरू केला होता. आता या निर्णयानंतर आशा भोसले संगीत अकॅडमी सुरू करण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. आशा भोसले यांनी राज्य सरकारकडे वांद्रे-अंधेरी दरम्यान हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. आता, आशा भोसले यांच्या नावाने स्मारक करायच का? असा मुद्दा मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित केला होता.

या निर्णयानुसार, संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी ही अकॅडमी मैलाचा दगड ठरणार आहे. बैठकीत आशाताईंच्या नावाने संगीत अकॅडमीसह पदभरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठाच्या स्थापनेसह आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT