Census Employees Transfer News: जनगणना कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक? केंद्राचा आदेश; महाराष्ट्रात काय होणार?

Government Transfer Officers and Employees News update: जनगणना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत केंद्र सरकारने आदेश दिले आहे. महाराष्ट्रात हा निर्णय लागू होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती.
Maharashtra Government Job Transfers News update
Maharashtra Government Job Transfers News updateSarkarnama
Published on
Updated on

जनगणना (Census) हे देशातील अत्यंत महत्त्वाचे प्रशासकीय काम मानले जाते. त्यामुळे या कामात सहभागी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना काही विशेष सवलती दिल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वाची सवलत म्हणजे बदली (Transfer) मधून सूट. जनगणनेचे काम होईपर्यंत या सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली करु नये, असे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले.

या पत्राच्या अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करणार का? संबधीत कर्मचाऱ्यांना चालू वर्षांत होणाऱ्या बदल्यांतून सुट मिळणार का? महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत सध्या प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरु असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान होणार आहे. यात घरगणना होणार आहे. दुसर्‍या टप्प्यात फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणना होणार आहे. याच कालावधीतच जनगणना अधिकार्‍यांची नियुक्ती व प्रशिक्षण प्रक्रिया बहुतांश राज्यात सुरू झाली असून महाराष्ट्रातही याबाबत प्रक्रिया सुरु झाली आहे.

जनगणना कार्यक्रमांसाठी नियुक्ती झाल्यानंतर हे काम पूर्ण झाल्याशिवाय या कर्मचारी, अधिकाऱ्यांची बदली करु नये, असे गृहसचिवांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या पत्रामुळे संभ्रम पसरला आहे. यामुळे बदल्या आणि पदोन्नती रखडणार हे स्पष्ट झाले आहे. एकदा नियुक्त झाल्यानंतर जनगणना पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांची ३१ मार्च २०२७ पर्यंत बदली करू नये, असे निर्देश गृह सचिवांनी दिले आहेत.

मात्र, महाराष्ट्रात याबाबत स्वतंत्रपणे कोणताही शासन निर्णय (GR) जाहीर झालेला नसल्याची माहिती समोर येत आहे. तरीही केंद्राच्या निर्देशांमुळे राज्यातही याची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Maharashtra Government Job Transfers News update
Ladki Bahin Yojana: हप्ता बंद का झाला? लाडक्या बहिणींना समजणार नेमके कारण; या कार्यालयात जा!

विशेष म्हणजे शिक्षक, ग्रामसेवक, महसूल विभागातील कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर जनगणना कामात सहभागी होतात. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम मोठ्या कर्मचाऱ्यांच्या वर्गावर होणार आहे.

Maharashtra Government Job Transfers News update
TET Exam: टीईटीमुळे मिळाला न्याय! तब्बल 13 वर्षांनंतर पगार सुरू, कोर्टाचा ZP प्रशासनाला दणका

बदलीतून सवलत म्हणजे काय?

जनगणनेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना (शिक्षक, ग्रामसेवक, लिपिक इ.) जनगणना पूर्ण होईपर्यंत बदली केली जात नाही किंवा त्यांच्या बदलीवर तात्पुरती स्थगिती दिली जाते.

Maharashtra Government Job Transfers News update
Maharashtra News: फडणवीसांचे धडाकेबाज निर्णय: AI वर भर, IT कॅडर; काय बदलणार?

ही सवलत कोणाला लागू होते?

  1. जनगणना अधिकारी (Census Officers)

  2. गणनाकर्मी / Enumerators

  3. पर्यवेक्षक (Supervisors)

  4. शिक्षक

  5. ग्रामसेवक

  6. महसूल व स्थानिक प्रशासन कर्मचारी

Maharashtra Government Job Transfers News update
TET Exam News: TET परीक्षेतून मिळणार दिलासा! नोकरीवरील टांगती तलवार दूर होणार; कुणाला मिळणार सूट

सवलतीमागील कारणे

  • जनगणना हे राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे काम आहे

  • कामात सातत्य राहण्यासाठी कर्मचाऱ्यांची स्थिरता आवश्यक असते

  • नवीन ठिकाणी बदली झाल्यास कामात अडथळे निर्माण होऊ शकतात

सवलतीचा कालावधी

  1. जनगणना प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत (घरगुती सर्वेक्षण, डेटा संकलन, पडताळणी)

  2. काम पूर्ण होईपर्यंत किंवा शासनाकडून वेगळा आदेश येईपर्यंत

Maharashtra Government Job Transfers News update
New Labour Code: आता वाया जाणार नाहीत तुमच्या सुट्ट्या; नवीन कायद्यामुळे शिल्लक रजेचे दरवर्षी मिळणार पैसे

महत्त्वाच्या अटी

  • बदलीची सवलत स्वयंचलित नसते, संबंधित विभागाकडून आदेश आवश्यक असतो

  • अत्यावश्यक प्रशासकीय कारणांसाठी काही अपवाद होऊ शकतात

  • कर्मचाऱ्यांनी जनगणना कामात सक्रिय सहभाग ठेवणे आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com