Asha Bhosle Passes  sarkarnama
महाराष्ट्र

Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

Asha Bhosle Passes : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले

Roshan More

Asha Bhosle News : आशा भोसले यांचे आज निधन झाले. शनिवारी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उद्या चार वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमाम अंत्यसंस्कार करण्यात येईल.

लोअर परेळ येथील त्यांच्या निवास्थानी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

आशा भोसले यांनी १९४०च्या दशकात गायन सुरू केली. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, इंग्रजी अशा २० पेक्षा अधिक भाषांमध्ये गाणी गायली त्यांनी 12 हजार पेक्षा अधिक गाणी गायली आहेत.

पिया तू अब तो आजा , दम मारो दम,चुरा लिया है तुमने, इन आँखों की मस्ती, रंगीला रे अशी एका पेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली. रोमँटिक, गझल, पॉप, कॅबरे, शास्त्रीय अशा विविध प्रकारच्या गाण्यांमध्ये त्यांची पकड होती. संगीतकार आर डी बर्मन यांच्यासोबतीची त्यांची जोडी खूप गाजली.

त्यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके याच्या अनेक फिल्मफेअर पुरस्कार, तसे आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक सन्मान मिळाले होते. आशा भोसले यांची कारकीर्द ७० वर्षांहून अधिक काळ चालली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT