Voter list SIR: महाराष्ट्रातही मतदार याद्या गाजण्याची चिन्हे; सत्ताधारी एकनाथ शिंदेंची शिवसेना लागली कामाला...

Nashik voter list Shiv Sena Eknath Shinde party gave orders to workers-महाराष्ट्रातही मतदार यांद्याची फेर पडताळणीच्या हालचाली, सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली तर विरोधक गाफील
Eknath-shinde
Eknath-shindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Eknath Shinde News: देशभर मतदारयादीचे पुनर्नरीक्षण वादात सापडले आहे. पाच ते दहा टक्के मतदारांची नावे वगळल्याने विरोधकांकडून गंभीर आरोप होत आहेत. त्यामुळे निवडणुका आयोग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होण्चाची चिन्हे आहेत.  

बिहार, पश्चिम बंगाल यांसह विविध राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदार यादी पुर्ननिरीक्षण झाले. त्यात मयत, अपात्र आणि संशयास्पद मतदारांची नावे वगळण्यात आली. निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर विरोधकांनी गंभीर आरोप केले. आता महाराष्ट्रातही त्याची तयारी सुरू झाली आहे. 

राज्यात सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत. मात्र मतदारयाद्यांचे पुर्ननीरीक्षण सुरू होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने तयारी सुरू केली आहे. 

Eknath-shinde
Prakash Ambedkar Video : महाराष्ट्रात 2 कोटी 90 लाख मतदारांची नावे कापली जाणार; एकनाथ शिंदेंना फटका..., प्रकाश आंबेडकरांचा खळबजनक दावा

नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी त्यासाठी बैठक घेतली. कार्यकर्त्यांना एसआयआर मोहिमेत सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी लोकसभा मतदारसंघात बूथनिहाय यादी तयार करून कार्यालयात सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

Eknath-shinde
ECI New Rule: निवडणूक आयोगाचा नवा नियम: ‘हा’ पुरावा असेल तरच मतदान करता येणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विशेष लक्ष घातले आहे. राज्यभर पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू करण्यात आली आहे. त्याची सुरुवात बूथस्तरावरून 'एसआयआर' मोहिमेत सहभागी होऊन करण्याचे आदेश दिले आहेत. 

आगामी निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी करायची असेल तर मतदार याद्यांवर काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही मोहीम प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. पुढील काळात संघटनेत चांगले काम केले तरच पुढच्या काळात कार्यकर्त्यांचा विचार होईल. त्यामुळे एसआयआर मोहिमेत लक्ष घालण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी यांचे पुनर्नरीक्षण (एसआयआर) विषयी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल आहे. विरोधकांकडून याबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहे. ठराविक मतदारांची आणि सत्याधार्‍यांना गैरसोयीची वाटणारी मतदारांची नावे व गळली जात आहेत, असा आरोप होतो आहे.

आता त्यावर महाराष्ट्रातही सत्ताधारी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने कंबर कसली आहे. या मोहिमेत कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक मात्र गाफील आहेत. त्यामुळे राज्यात एक नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com