Bachchu Kadu, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Bachchu Kadu : "आम्ही स्वतःच्या कष्टाचंच खातो..." फडणवीसांनी विठ्ठलाची पूजा करताच बच्चू कडूंनी टायमिंग साधलं

Bachchu Kadu Loan Waiver : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांवर मागील महिन्यात बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केलं. मात्र, ते त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर अद्याप ठाम आहेत. अशातच आज आषाढी एकादशीचं औचित्य साधत त्यांनी राज्य सरकारला कर्जमाफीच्या मुद्द्याची आठवण करून दिली आहे.

Jagdish Patil

Bachchu Kadu Loan Waiver : आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.6) पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केली. या पूजेनंतर त्यांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केल्याचं सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केल्याचं टायमिंग साधत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. विठ्ठला सरकारला कर्जमाफी देण्याची सदबुद्धी दे, असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे.

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांवर मागील महिन्यात बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केलं. मात्र, ते त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर अद्याप ठाम आहेत. अशातच आज आषाढी एकादशीचं औचित्य साधत त्यांनी राज्य सरकारला कर्जमाफीच्या मुद्द्याची आठवण करून दिली आहे.

बच्चू कडू यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, 'विठ्ठला, मागील 3 महिन्यात महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय. दिवसरात्र शेतात राबून बळीराजा साऱ्या जगाचं पोट भरण्यासाठी आपला घाम गाळतो, कष्ट करून जीवाचं रान करतो. पण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजावरच उपाशीपोटी झोपायची वेळ सध्या आली आहे.

विठ्ठला, आमची शेतकऱ्याची जात हाय. स्वतःच्या कष्टाचंच आम्ही खातो. फुकट काही मिळायची आमची अपेक्षा पण नसते आणि तसलं आम्हाला पचनी देखील पडत नाही. पण काबाडकष्ट करून, मातीत पैसा ओतून जो शेतमाल आम्ही पिकवतो त्यााला जर किमान बाजारभाव भेटला नाही अन नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे नुकसान झाले तर मात्र आम्ही कुणाकडे मदतीची याचना करायची? कुणाकडे पदर पसरायचा?

विठ्ठला तुझ्या दारात भक्ताला जात, पात, धर्म, रंग नसतो तसाच शेतकऱ्याच्या कपाळावरही फक्त शेतकरीच लिहिलेलं असतं. तेव्हा पांडुरंगा, राजकारण बाजूला ठेऊन सरकारला कर्जमाफीचा निर्णय देण्याची सदबुद्धी दे अशी तुझ्याकडे प्रार्थना" अशा शब्दात त्यांनी कर्जमाफीवरून सरकावर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT