Raj-Uddhav Thackeray Alliance : सत्तेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले म्हणणाऱ्यांना मनसेचे सणसणीत उत्तर, 'तो' फोटो दाखवला अन् गारच केले

Raj Thackeray Uddhav Thackeray Sandeep Sandeep Deshpande : भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक फोटो दाखवून सणसणीत उत्तर दिले आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray
Raj Thackeray Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

MNS VS BJP : मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. आपण दोघे आत्ता एकत्र राहणार असल्याचे देखील दोघांनीही सांगितले. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडून मराठीचे प्रेम हे फक्त दाखवण्यासाठी आहे. सत्तेसाठी दोघे भाऊ एकत्र आल्याची टीका करण्यात येत आहे.

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक फोटो दाखवून सणसणीत उत्तर दिले आहे. या फोटोसह 'मग तुम्ही?' असा प्रश्न प्रतिप्रश्न देखील देशपांडे यांनी केला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत तर त्या खालच्या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार, नारायण राणे, सुनिल तटकरे छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे बसलेले दिसत आहेत.

राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले. अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचे आरोप भाजपकडून करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते नेते भाजपसोबत सत्तेत आहेत. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आहेत. त्यावरून सत्तेसाठी ठाकरे बंधु एकत्रित येत असल्याच्या टीका करणाऱ्यांना या फोटोद्वारे मनसेकडून उत्तर देण्यात आले आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray
Sanjay Gaikwad : हिंदी भाषेचं समर्थन करताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या 'त्या' विधानामुळे नवा वाद

भक्तांचे लाॅजिक म्हणत डिवचले

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सत्तेसाठी भाऊ एकत्र आले म्हणणाऱ्यांना उत्तर दिले आहे. त्यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह बसले असल्याचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, भक्तांचं लाॅजिक वरच्या पंक्तीतले नेते सत्तेसाठी एकत्र आलेले नाहीत पण दोन भाऊ एकत्र आले तर ते सत्तेसाठी एकत्र आले व्हा रे.

Raj Thackeray Uddhav Thackeray
Nitin Gadkari : नितीन गडकरींची एकनाथ शिंदेंच्या आमदाराला तंबी, म्हणाले, 'सुधारणार...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com