Maharashtra government Warkari insurance scheme Sarkarnama
महाराष्ट्र

Ashadhi Wari Update : वारीदरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांना मिळणार चार लाख रुपये; जखमींनाही मिळणार मदत, जाणून घ्या सरकारची योजना...

Ashadhi Wari compensation scheme: सरकारची ही योजना श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी लागू राहील.

Rajanand More

Warkari welfare scheme Maharashtra: आषाढी वारी दरम्यान म्हणजे वारी सुरू झाल्याच्या तारखेपासून ते वारी समाप्त होण्याच्या तारखेपर्यंतच्या कालावधीसाठी राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-२०२६ राबविण्यात येणार आहे. वारीदरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना तसेच जखमी झालेल्या वारकऱ्यांकडून सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.

राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या जीआरनुसार, ता. ७ ते २५ जुलै या कालावधीत अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांना ४ लाख रुपये मदत दिली जाणार आहे.

वारीदरम्यान ४० ते ६० टक्के अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना ७४ हजार आणि ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाणार आहे. तर एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यास १६ हजार आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल झाल्यास ५ हजार ४०० रुपयांची मदत दिली जाणार आहे.

अशी मिळेल मदत

सरकारची ही योजना श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी लागू राहील. तसेच संबंधित वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अजासोबत सोडणे आवश्यक राहील. सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी वारीमध्ये गेल्याची खात्री करून तशा स्वरुपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्यांच्या वारसदारांना द्यावे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित वारकरी किंवा त्यांच्या वारसदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरीत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज आल्यास तहसीलदारांचे प्रमाणपत्र, मृत्यू किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करून वितरीत करावे, असे आदेश सरकारने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT