BJP Legal Notice : भाजपकडून आमदारांना 20-30 कोटी, मंत्रिपदाची ऑफर..! विरोधी पक्षाने थेट मुख्यमंत्र्यांनाच अडकवलं कायद्याच्या कचाट्यात

Omar Abdullah, Sat Paul Sharma, Jammu Kashmir politics, J&K BJP : माफी न मागितल्यास फौजदारी खटल्यासोबतच मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
BJP legal notice to Omar Abdullah
BJP legal notice to Omar AbdullahSarkarnama
Published on
Updated on

Operation Lotus allegations in Jammu and Kashmir: मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात नगरसेवक, आमदार, खासदार फोडाफोडावरून सत्ताधारी आणि विरोधक नेहमीच आमनेसामने उभे ठाकतात.

आमदारांना फोडण्यासाठी कोटींच्या ऑफर दिल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. पण सत्ताधाऱ्यांकडून त्यावर पलटवार करत आरोप फेटाळले जातात. पण जम्मू-काश्मीरमधून मोठी घडामोड समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. श्रीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना अब्दुल्ला म्हणाले होते की, भाजपकडून नॅशनल कॉन्फरन्सच्या जम्मू भागातील आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांना २० ते ३० कोटी रुपये आणि मंत्रि‍पदाची ऑफर दिली जात आहे.

केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासनही या आमदारांना दिले जात असल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी केला होता. सुप्रीम कोर्टात वकील असलेल्या भाजपमधील वरिष्ठ नेत्याने आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचेही अब्दुल्ला यांनी म्हटले होते.

BJP legal notice to Omar Abdullah
Manmohan Singh news : मी आत्महत्या करेन! माजी PM मनमोहन सिंग यांच्याबाबत तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांकडून मोठा खुलासा

अब्दुल्ला यांच्या या आरोपांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभेचे खासदार सतपाल शर्मा यांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या चुकीच्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी झाली आहे. आरोपांना कोणताही आधार नाही.

हे आरोप पुढील सात दिवसांत मागे घेत सार्वजनिक माफी मागावी, असे नोटिशीत म्हटले आहे. माफी न मागितल्यास फौजदारी खटल्यासोबतच मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

BJP legal notice to Omar Abdullah
सत्ता कुणाचीही असो, 'या' महिला नेत्याची खासदारकी फिक्स; भाजपलाही भूरळ...

दरम्यान, राज्यात सध्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची सत्ता आहे. प्रामुख्याने जम्मू भागात भाजपचे आमदार मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत. त्याच भागाताली सत्ताधारी आमदारांना भाजपकडून ऑफर दिली जात असल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी केला आहे. विशेष म्हणजे ते येत्या २० जुलैपासून जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याबाबतच्या मागणीसाठी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन सुरू करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com