Ashok Chavan  Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Chavan Audio Clip: जीवे मारण्याच्या धमकीच्या ऑडिओ क्लिपवर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; नावाचा उल्लेख मान्य करत म्हणाले...

Ashok Chavan and four MLAs bomb threat : अशोक चव्हाण यांच्यासह 4 आमदारांना बॉम्बने उडवण्याचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. खंडणीखोर आरोपीच्या कथित कबुलीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी.

Jagdish Pansare

Nanded : नांदेडमधील एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावणाऱ्या आरोपीने खासदार अशोक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदारांना उडवून देण्याचा कट रचला होता, अशी माहिती संबंधिताला धमकावताना दिली होती. आरोपी आणि खंडणीसाठी फोन आलेल्या व्यापाऱ्यामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ देखील समोर आली आहे. या संदर्भात पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला पोलीसांनी अटकही केली आहे. या प्रकाराने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अशोक चव्हाण यांनी स्वतः जीवे मारण्याच्या धमकीच्या ऑडिओमध्ये माझ्या नावाचा उल्लेख असल्याचे माध्यमांना सांगीतले. अशोक चव्हाण असा उल्लेख आरोपीने आपल्या संभाषणात केल्याचे चव्हाण यांनी सांगीतले. इतर चार आमदारांचाही यात उल्लेख आहे, पण त्यांची नावे यात घेण्यात आलेली नाहीत. पोलीसांकडे यांची ऑडिओ उपलब्ध आहे. या संदर्भात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

माझ्यासह चार आमदारांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता, असे यातून दिसते आहे. आरोपीला अटक झालेली असल्यामुळे पोलीस तपासात जे समोर येईल, त्यावरून कारवाई केली जाईल, असेही चव्हाण यांनी माध्यमांशी बोलतांना सांगीतले. खंडणीसाठी व्यापाऱ्याला धमकावणाऱ्या या आरोपीने फोनवरून आपण तीन वर्षापूर्वी कारेगाव येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह चार आमदारांना उडवण्याचा प्लॅन आखला होता. माझ्या पाठीमागे मोठे लक आहेत, अशी धमकी संबंधित व्यापाऱ्याला दिली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

या संदर्भात महेश कृष्णाजी तुतारे यांनी पोलीसात फिर्याद दिली होती.या प्रकरणी नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. हे प्रकरण पोलीसांनी गांभीर्याने घेत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून मुबईतील परेड रोड येथील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय येथून रवी काकडे या आरोपीला ताब्यात घेतले. तो व्यावसायाने दिग्दर्शक असल्याचे सांगीतले जाते.

SCROLL FOR NEXT