Ashok Chavan : अशोक चव्हाणांसह 4 आमदारांना उडवून देण्याचा कट; खंडणीखोर आरोपीच्या कबुलीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

Maharashtra MLA bomb attack conspiracy : अशोक चव्हाण यांच्यासह 4 आमदारांना बॉम्बने उडवण्याचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. खंडणीखोर आरोपीच्या कथित कबुलीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी.
Maharashtra MLA bomb attack conspiracy
Maharashtra MLA bomb attack conspiracySarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded Crime : खासदार अशोक चव्हाण यांच्यासह चार आमदारांना उडवण्याचा आपण तीन वर्षापूर्वी कारेगाव येथे प्लाॅन आखला होता, असा दावा एका खंडणी प्रकरणातील आरोपीने केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रवी उर्फ रविंद्र गौतम रोकडे याला एका व्यापाऱ्याला खंडणी मागण्याच्या आरोपात पोलीसांनी अटक केली. या प्रकरणात तपास करत असताना खळबळजनक माहिती समोर आली.

खंडणीसाठी व्यापाऱ्याला धमकावणाऱ्या या आरोपीने फोनवरून आपण तीन वर्षापुर्वी कारेगाव येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह चार आमदारांना उडवण्याचा प्लान आखला होता. माझ्या पाठीमागे मोठे लक आहेत, अशी धमकी गौतम काकडे या आरोपींनी संबंधित व्यापाऱ्याला दिली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. या संदर्भात महेश कृष्णाजी तुतारे यांनी पोलीसात फिर्याद दिली होती.

Maharashtra MLA bomb attack conspiracy
Shiv Sena political controversy : शिवसेना नेत्यानेच बाळासाहेंबांचा फोटो फाडल्याने घमासान, नेमंक घडलं काय?

या प्रकरणी नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. हे प्रकरण पोलीसांनी गांभीर्याने घेत पोलीस अधीक्षक डाॅ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून मुबईतील परेड रोड येथील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय येथून रवी काकडे या आरोपीला ताब्यात घेतले. तो व्यावसायाने दिग्दर्शक असल्याचे सांगीतले जाते. तीन वर्षापूर्वी त्याने अशोक चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना उडवून देण्याचा कट रचला होता, अशी माहिती तपासा दरम्यान समोर आली.

यातील फिर्यादी महेश कृष्णाजी तुतारे आणि आरोपी रवी रोकडे यांची जुनी ओळख होती. आरोपी गेल्या काही दिवसांपासून फिर्यादीकडे पैशांची मागणी करून धमकावत होता. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी आरोपीने फोन करून फिर्यादीकडे १ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने, 'मी तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि नांदेडच्या चार आमदारांना उडवण्याचा प्लॅन केला होता, माझ्या पाठीशी मोठ्या लोकांचे हात आहेत', अशी गंभीर धमकीच त्याने दिली.

Maharashtra MLA bomb attack conspiracy
Bajrang Sonawane : बजरंग सोनवणेंनी दंड थोपटले, निवडणुकीच्या तीन वर्षे आधीच मोठी घोषणा, मी पुन्हा...

या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला पुढील कारवाईसाठी वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीने नेमक्या कोणत्या हेतूने हा कट रचला, यामागे त्याचे इतर साथीदार आहेत का? याचा सखोल तपास करण्यासाठी त्याला नांदेड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. व्ही. बोयणे करीत आहेत.